SA vs AFG:  Saam tv
Sports

SA vs AFG: डुसेनची दमदार फलंदाजी, दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून अफगाणिस्तानला चारली धूळ

SA vs AFG: विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे.

Vishal Gangurde

SA vs AFG:

विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. आफ्रिकेने तब्बल ५ गडी राखून विजय प्राप्त केला आहे. (Latest Marathi News)

दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या डुसेनच्या अर्धशकताच्या जोरावर अफगाणिस्तानला धूळ चारली आहे. दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकल्याने त्याचा फायदा गुणतालिकेतही झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. अफगाणिस्तानने २४५ धावांचं आव्हान उभं करताना अजमतुल्लाहने नाबाद ९७ धावांची खेळी खेळली. तर अफगाणिस्तानने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डुसेनने ७६ धावा कुटल्या. तर दक्षिण आफ्रिकेने ४७.३ षटकात ५ गडी गमावून २४७ धावा करत सामना जिंकला.

अफगाणिस्तानची २४४ धावांची खेळी

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अजमतुल्लाह उमरजईच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ५० षटकात २४४ धावा केल्या. अजमतुल्लाहचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं.

अफगाणिस्तानला पहिला धक्का ४१ धावांवर बसला. गुरबाज २२ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. जादरानने फक्त १२ धावा केल्या. तर फलंदाजांची पडझड सुरु असताना रहमत शाह आणि उमरजईने संघाची कमान सांभाळली. या डावात रहमतने ४६ चेंडूत २६ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेच्या गेराल्ड कोइट्जीने अफगाणिस्तानचे ४ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT