ODI World Cup 2023 saam Tv
क्रीडा

PAK vs SA, World Cup: महाराजनं राखली आफ्रिकेची लाज; तब्बल २४ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानवर मिळवला विजय

Bharat Jadhav

PAK vs SA World Cup:

चेन्नईमधील एमए चिंदबरम स्टेडिअममध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात वर्ल्ड कपचा २६ वा सामना खेळला गेला. आफ्रिकेच्या संघाने १ विकेट राखत पाकिस्तानला पराभूत केलं. या पराभवामुळे उपांत्य फेरीत गाठणं पाकच्या संघासाठी कठीण झालं आहे. दरम्यान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा चौथ्यांदा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आव्हान माफक वाटत असलं तरी पाक गोलंदाजांनी ते सहजासहजी मिळून दिलं नाही. (Latest News)

दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आव्हान माफक वाटत असलं तरी पाक गोलंदाजांनी ते सहजासहजी मिळून दिलं नाही. सहज होणारा सामन्याने क्रिकेट चाहत्याचा जीव टांगणीला बांधला होता. परंतु भारतीय वंशाच्या केशव महाराजने विजयी चौकार मारत दक्षिण आफ्रिकेच्या संघाची लाज राखली. इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिकेला १९९९ नंतर विजय मिळवून दिला. वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये आफ्रिकेने पाकिस्तानवर तब्बल २४ वर्षानंतर विजय मिळवला. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

नॉन स्ट्राइकवर असलेला तरबेजच्या मनातही महाराजला स्ट्राईक द्यायची होती. त्यासाठी त्याने मोठ्या चुतराईने महाराजला स्ट्राईक दिली. महाराजने आपल्या फलंदाजीवर आत्मविश्वास ठेवत विजयी चौकार लगावला.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेच्या संघासमोर २७१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आफ्रिकेसाठी हे आव्हान जरी साधारण वाटत असलं तरी पाक गोलंदाजांनी त्याला कठीण बनवलं. विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट गमावावे लागल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४७. २ षटकांत ऐतिहासिक विजय मिळवला.

दरम्यान या पराभवामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठणे जरा कठीण झाले आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने ५ वा विजय नोंदवला असून हा संघ आता अव्वल स्थानावर पोहोचलाय. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ४६.४ षटकात २७० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २७१ धावांचे आव्हान ठेवले. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना सऊद शकीलने ५२ धावा केल्या.

तर कर्णधार बाबर आझमने ५० धावा करत संघाला २७० धावांच्या शिखरावर पोहोचवलं होतं. पाकचा संघ पूर्ण षटकं खेळू शकला नाही. आफिकेचा गोलंदाज तबरेज शम्सीने चार विकेट घेत पाकच्या संघाला मोठी धावसंख्या करू दिले नाही. तरबेजला प्लेअर ऑफ मॅच म्हणून घोषित करण्यात आले आहे. सामन्यानंतर बोलताना आपल्या कामगिरीवर तबरेझ शम्सी खूश होता.

खरंच आनंदी. मला माहित होते की मला काय काम करायचे आहे आहे, परंतु माझ्या आधीच्या लोकांनी ते सेट केले. याचे श्रेय त्या लोकांनाही जाते. मी पुरेसे क्रिकेट खेळले आहेत. काहीवेळा काही सामने तुमच्यासाठी असतात तर , काहीवेळा नाही. ही मुलाखत करताना मी माझ्या पॅडसह येथे येण्याची अपेक्षा केली नव्हती. (शेवटच्या षटकात) जर मी मोठा फटका खेळता आला नाही तर चेंज रूममध्ये माझे स्वागत झाले नसते. त्यामुळे मला फक्त बचाव करायचा होता आणि केशला स्ट्राइकवर आणायचे होते, असं तबरेझ शम्सी म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT