Danish Kaneria: शाहिद आफ्रिदीने माझा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला; दानिश कनेरियाचा आरोप

Danish Kaneria : पाकिस्तान फिरकी गोलंदाज दिनेश कनेरिया एका खळबळजनक आरोपामुळे चर्चेत आले आहेत.
Danish Kaneria
Danish KaneriaSaam Tv
Published On

Pakistani cricketer Danish Kaneria :

माजी पाकिस्तान फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर धर्मांतराचा आरोप केलाय. शाहिद आफ्रिदी आपल्याला इस्लाम धर्म स्विकारासाठी आग्रह करत होता असा आरोप कनेरियाने एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केलाय. पाकिस्तानच्या संघात क्रिकेट खेळताना आपल्याला अनेक खेळाडूकडून त्रास झाला. यादरम्यान फक्त इंझमाम-उल-हक हाच एक असा कर्णधार होता ज्याने मला पाठिंबा दिला, असं कनेरिया या मुलाखतीत म्हटलंय. (Latest News)

दानिश कनेरियाने पाकिस्तानच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सन २००० मध्ये पदार्पण केलं. सर्वाधिक विकेट घेणारा पाक फिरकी गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. कनेरियाने पाक संघाकडून ६१ कसोटी सामने खेळले असून ३४.७९ च्या सरासरीने त्याने २६१ विकेट घेतल्या आहे. यात दोन मोठ्या कामगिरी त्याच्या नावावर आहेत. कनेरियाने १५ धावा देत ५ विकेट घेतले होत्या. तर दोनदा त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या १० च्या १० विकेट घेतल्या आहेत. परंतु कनेरिया त्याच्या कामगिरीपेक्षा त्याच्या वादामुळे जास्त चर्चेत राहिलाय. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

आता परत तो एका खळबळजनक आरोपामुळे चर्चेत आलाय. दानिशने कनेरियाने आफ्रिदीवर धर्मांतराचा आरोप केलाय. आज तक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतात त्याने हा आरोप केलाय. पाक संघाकडून आपल्यासोबत भेदभाव केला जात होता. अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला असल्याचं कनेरियाने या मुलाखतीत सांगितलं.

मी चांगली काम करत होतो, देशासाठी क्रिकेट चांगला खेळत होतो. इंझमाम-उल-हकने हाच एक कर्णधार आहे ज्याने मला पाठिंबा दिला. त्याच्यासोबत शोएब अख्तरनेही मला पाठिंबा दिला. परंतु शाहिद आफ्रिदी आणि इतर पाकिस्तानी खेळाडूंनी मला खूप त्रास दिला ते माझ्यासोबत जेवण सुद्धा करत नव्हते. ते नेहमी माझ्यासोबत गप्पा करताना मला धर्म बदलण्यासाठी सांगायचे. पण माझा धर्मच माझ्यासाठी सर्वस्व आहे. शाहिद आफ्रिदीने मला बऱ्याचदा धर्मांतर करण्यास सांगितले होते. परंतु इंझमाम-उल-हक कधीच या विषयावर बोलत नसायचा.

मी मुस्लीम नसल्यानं मला पीसीबी कधी मदत करत नव्हते. माझी कामगिरी चांगली होती. मी चांगला क्रिकेट खेळत होतो. परंतु मला खेळण्याची संधी मिळत नव्हती. कारण मी मुस्लीम नव्हतो. परंतु भारतात मात्र तसं नाही. भारतात प्रत्येक खेळाडूला समान संधी मिळते. पीसीबीने मला पाठिंबा दिला नाही कारण मी हिंदू आहे. माझ्या कामगिरीच्या आधारे ते मला वगळू शकत नाहीत. त्यांना माहित होते की मी सर्व रेकॉर्ड मोडू शकतो. त्यामुळे मला संधी मिळाली नाही. पाकिस्तानमध्ये कधीच हिंदूं खेळाडूच्या श्रेणीत वाढ झालेली नाही.

Danish Kaneria
Amol Muzumdar: भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षक म्हणून मिळाला 'दुसरा सचिन'; पदार्पणातच कुटल्या होत्या २६० धावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com