south africa yandex
Sports

Champions Trophy: ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपणार? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला तगडा संघ

South Africa Squad For ICC Champions Trophy: आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला तगडा संघ जाहीर केला आहे. कोणाला संधी मिळाली?

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. ही स्पर्धा येत्या १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा करायला सुरुवात केली आहे. सोमवारी ( १३ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेनेही आपला संघ जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद टेम्बा बावुमाकडे सोपवण्यात आले आहे.

रॉब वॉल्टरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघातील १० खेळाडू असे आहेत, जे २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसून आले होते.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने दमदार खेळ करत फायनलपर्यंत मजल मारली होती. या संघात २ वेगवान गोलंदाजांना कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे. संघातील वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया आणि लुंगी एन्गिडी यांना कमबॅकची संधी दिली गेली आहे.

एनरिक नॉर्खिया सप्टेंबर २०२३ नंतर पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. मात्र आता त्याचं कमबॅक झाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाची ताकद दुपटीने वाढणार आहे.

तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी ऑक्टोबर २०२४ नंतर मैदानात उतरला नव्हता. त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. आता तो चॅम्पियन्स ट्रॉफीतून कमबॅक करताना दिसून येणार आहे.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ:

टेम्बा बवुमा (कर्णधार), टोनी डी झॉर्जी, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्ट्जे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी व्हॅन डेर डुसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT