virat kohli and sourav ganguly  saam tv
Sports

Virat Kohli IPL 2023: हाय व्होल्टेज सामन्यात विराट अन् गांगुलीने वाढवला पारा! सामन्यानंतर नेमकं काय घडलं? - VIDEO

IPL 2023 Virat Kohli on Sourav Ganguly: या सामन्यात असे काही घडले जे यापूर्वी कधीच घडले नव्हते.

Ankush Dhavre

Virat Kohli And Sourav Ganguly: आयपीएल २०२३ स्पर्धेत शनिवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोरदार कामगिरी करत २३ धावांनी विजय मिळवला.

या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या ताफ्यात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान या सामन्यात असे काही घडले जे यापूर्वी कधीच घडले नव्हते.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या रोमांचक सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने बाजी मारली आणि दिल्ली कॅपिटल्स संघाला या हंगामातील सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. हा सामना झाल्यानंतर विराट कोहलीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक सौरव गांगुली डग आउटमध्ये बसल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाताना दिसून येत आहे. दोघांची नजर एकमेकांना भिडते अन् दोघेही एकमेकांना रागात पाहताना दिसून आले आहेत.

तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सामना झाल्यानंतर विराट खेळाडू एकमेकांसोबत हात मिळवताना दिसून येत आहेत.

मात्र ज्यावेळी विराट कोहली आणि सौरव गांगुली हात मिळवण्यासाठी समोरा समोर येतात, त्यावेळी सौरव गांगुली हात न मिळवताच पुढे निघून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

विराट आणि सौरव गांगुली यांच्यात काय घडलं होतं?

विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यावेळी विराट विरुद्ध गांगुली हा सामना २०२१ च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये चांगलाच रंगला. सप्टेंबर महिन्यात विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याचे वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते.

विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, आम्ही विराटला कर्णधारपद सोडण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र ही बाब जेव्हा विराटला विचारण्यात आली त्यावेळी त्याने स्पष्ट नकार देत, 'मला कोणीही विचार करण्याचा सल्ला दिला नव्हता'असे म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT