IPL 2023 Shikhar Dhawan: शिखर धवन ऐवजी सॅम करन टॉससाठी का आला? यामागचं प्रमुख कारण आलं समोर

LSG VS PBKS IPL 2023: शिखर धवन ऐवजी सॅम करन नाणेफेक करण्यासाठी का आला? यामागचं कारण आता समोर आलं आहे.
SAM CURRAN
SAM CURRANSaam Tv

IPL 2023 live updates: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २१ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्व सुरु असलेला हा सामना पंजाब किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मात्र शिखर धवन ऐवजी सॅम करन नाणेफेक करण्यासाठी का आला? यामागचं कारण आता समोर आलं आहे.

SAM CURRAN
IPL 2023 : JioCinema वर IPL पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी; आता पैसे मोजून घ्यावं लागेल सबस्क्रिप्शन; जाणून घ्या संपूर्ण माहिती

शिखर धवन हा पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. गेल्या काही सामन्यांमध्ये पंजाब संघाने निराशाजनक कामगिरी केली असली तरीदेखील शिखर धवन जोरदार कामगिरी करतोय. हेच कारण आहे की शिखर धवन हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. मात्र लखनऊ विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात तो खेळताना दिसून आला नाहीये.

शिखर धवन न खेळण्याचं कारण काय?

पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. हेच कारण आहे की तो या सामन्यात खेळताना दिसून येत नाहीये. तसेच तो येणाऱ्या सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार की नाही. याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाहीये. त्याच्या ऐवजी सॅम करन संघाचे नेतृत्त्व करणार आहे. (Latest sports updates)

SAM CURRAN
RCB VS DC IPL 2023: RCB ची ताकद दुपटीने वाढली! २ दिग्गज खेळाडूंचे संघात जोरदार कमबॅक

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स :

केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई

पंजाब किंग्ज:

अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com