Arshin Kulkarni Saam TV
Sports

Arshin Kulkarni News : सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची भारतीय क्रिकेट संघात निवड, अंडर १९ संघाकडून खेळणार

India Under 19 Team : दुबई येथे होणाऱ्या युवा आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याचे बीसीसीआयनेने नुकतेच त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची भारतीय संघात निवड झाली आहे. विजयवाडा येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरीच्या आधारावर अर्शिनला ही संधी मिळाली आहे.

दुबई येथे होणाऱ्या युवा आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याचे बीसीसीआयनेने नुकतेच त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्शिन मागील दोन वर्षे महाराष्ट्राच्या १६ आणि १९ वर्षांखालील संघाकडून खेळत असून त्यातदेखील त्याचे उत्कृष्ट प्रदर्शन राहिले आहे. त्याच खेळाच्या जोरावर यावर्षी त्याची निवड महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी झाली अन् त्यातच त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीमध्ये देखील चुणूक दाखवली.  (Latest News)

अर्शिनचे हे अष्टपैलूत्व हेरत त्याला यावर्षी महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात सय्यद मुश्ताक अली चषकसाठी निवडण्यात आले. त्या स्पर्धेतदेखील चमकदार कामगिरीच्या आधारावर त्याची देशातील १९ वर्षांखालील मुलांच्या चॅलेंजर चषकासाठी निवड झाली. शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अतुल कुलकर्णी यांचा अर्शिन हा मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT