Hardik Pandya News : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतणार? रोहित शर्माचं काय होणार?

Hardik Pandya News : मुंबईला हार्दिकचं मानधन जवळपास 15 कोटी रुपये गुजरात टायटन्सला ट्रान्सफर करावे लागणार आहेत. हार्दिकला ट्रान्सफर फीच्या 50 टक्के रक्कम मिळेल.
Hardik Pandya
Hardik PandyaSaam TV
Published On

IPL News :

क्रिकेट वर्ल्डकपनंतर आता क्रिकेटरसिकांना आता आयपीएलची प्रतीक्षा आहे. मात्र आयपीएल सुरु होण्याआधी अनेक मोठे फेरबदल होण्यची शक्यता वर्तवली जात आहे. 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात चॅम्पियन बनवलं होतं. मात्र आता तोच हार्दिक पंड्या गुजरात संघ सोडण्याच्या तयारीत आहे.

मुंबई त्याला ट्रेड विंडोद्वारे आपल्या संघात सामील करू इच्छित आहे. गुजरातही हार्दिकला सोडण्याच्या तयारीत आहे. मात्र, मुंबईकडे सध्या फंडची कमतरता आहे. 26 तारखेला ट्रान्सफर विंडो बंद होईल. त्यापूर्वी ही रक्कम मुंबईला भरावी लागणार आहे. यासाठी करार जवळपास निश्चित झाला असल्याचीही माहिती समोर येत आहे. (Latest sports updates)

Hardik Pandya
Diamond Duck: क्रिकेटमध्ये डायमंड डक म्हणजे काय? ज्यामुळे अर्शदीप अन् ऋतुराज झाले बाद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईला हार्दिकचं मानधन जवळपास 15 कोटी रुपये गुजरात टायटन्सला ट्रान्सफर करावे लागणार आहेत. हार्दिकला ट्रान्सफर फीच्या 50 टक्के रक्कम मिळेल. हार्दिकच्या रुपाने जवळपास 10 वर्षांनंतर मुंबईला नवा कर्णधार मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रोहित शर्माचं काय होणार?

हार्दिक सध्या गुजरातचा कर्णधार असून त्याला मुंबईचे कर्णधारपद दिले जाते की नाही हे देखील अद्याप स्पष्ट नाही. रोहित शर्मा 2013 पासून मुंबईचा कर्णधार आहे. त्याच्या जागी हार्दिकला नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. हार्दिक हा टीम इंडियाचा टी-20 कर्णधार देखील आहे आणि त्याची आतापर्यंतची कामगिरी देखील चांगली आहे. रोहितचे T20 मधील अनिश्चित भविष्य लक्षात घेऊन मुंबई हा निर्णय घेऊ शकते.

मुंबईची अडचण काय?

जर हा करार झाला तर आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा प्लेअर ट्रेड असेल. मात्र, दोन्ही फ्रँचायझींनी याबाबत अद्याप कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रेडसाठी पुरेशी रक्कम पर्समध्ये असणे हे मुंबईसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. शेवटच्या लिलावानंतर, मुंबईकडे फक्त 5 लाख रुपये शिल्लक होते. फ्रँचायझीला आगामी लिलावासाठी त्याच्या पर्समध्ये अतिरिक्त 5 कोटी रुपये मिळतील.

याचा अर्थ हार्दिकचा समावेश करण्यासाठी मुंबईला एक-दोन मोठे खेळाडू रिलीज करावे लागतील. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता याबाबतची मुदत संपेल. त्यामुळे २६ तारखेलाच कळेल की कोणता संघ कोणता खेळाडू रिटेन करतोय आणि कोणाला रिलीज करतोय.

Hardik Pandya
IPL 2024: आयपीएल ट्रेड आणि स्वॅप म्हणजे काय? वाचा शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

कोण असेल गुजरातचा नवा कर्णधार?

हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसेल. गुजरातकडे सध्या शुभमन व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर असे खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंनी गेल्या दोन मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला आहे. मात्र हार्दिक बाहेर गेल्यास गुजरात व्यवस्थापन आपला नवा कर्णधार कुणाला निवडणार हे पाहावं लागेल. शुभमन गील सध्या या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याचा फिटनेस आणि त्याचा फॉर्म जमेची बाजू आहे. याशिवाय विल्यमसनच्या रूपाने गुजरातकडेही अनुभव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com