मुंबईत मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन मुंबई महानगरपालिका देखील अॅक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे.
त्यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील पथक गठीत करण्यात आले आहे. त्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले असून दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. त्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले असून दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत.
त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी आणि उप आयुक्त (विशेष) श्री.संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करीता विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे.
सदर कारवाई दरम्यान ज्या दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतुद व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यानुसार मराठी नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावले नसल्यास अशा दुकाने व आस्थापना मालकांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल. सदर बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्टट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.