Maharashtra Political News: मराठी पाट्या लावा, अन्यथा...; मनसेचा 'खळखट्याक' इशारा

Maharashtra MNS Political News: मराठी पाट्यांच्या मुद्यांवरून मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दुकानाला मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक करू, असा इशारा दुकानदारांना दिला आहे.
Raj thackeray news
Raj thackeray newssaam tv
Published On

Maharashtra Political News:

राज्यातील सर्व दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाने २५ नोव्हेंबर ही मुदत दिली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. याच मराठी पाट्यांच्या मुद्यांवरून मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दुकानाला मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक करू, असा इशारा दुकानदारांना दिला आहे. (Latest Marathi News)

मनसेकडून (MNS) मराठी पाट्यांसाठी राज्यभरात आक्रमक आंदोलन करण्यात आली होती. याच मराठी पाट्यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने नियमावली आखून दिली आहे. त्याप्रमाणे २५ नोहेंबर २०२३ पर्यंत राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय दिला आहे. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj thackeray news
Mumbai News : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कोर्टाकडे अजब मागणी; अर्ज केला दाखल

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकानावरील पाट्या मराठीत करण्यास भाग पाडावे, अशा आशयाचं निवेदन दिले आहे. पुढील दोन दिवसानंतर ज्या दुकानांवर मराठी फलक आढळून येणार नाही. त्यांच्यासाठी मनसे शैलीत खळखट्याक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने या निवदेनात दिलं आहे.

Raj thackeray news
Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्री महाराजांवर गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी; काय आहे प्रकरण?

मुंबईतही मनसेचा इशारा

सुप्रीम कोर्टाने दुकानावर मराठी पाट्यांबाबत डेडलाइन दिल्यानंतर मनसेही सज्ज झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भात मनसेने दुकानदारांना इशारा दिला आहे. मराठी पाट्या करा अन्यथा मनसेच्या खळखट्याकला तयार रहा, असा इशारा मनसेचे चेंबूर विभागाचे अध्यक्ष माऊली थोरावे यांनी दिलं आहे.

Raj thackeray news
SSC-HSC Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार? केव्हापासून अंमलबजावणी होणार? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com