इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. नव्या परीक्षा पद्धतीनुसार, दिवाळआधी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे आणि अंतिम सत्र होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या पद्धतीची अंमलबजावणी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षात होण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)
'दैनिक सकाळ'च्या वृत्तानुसार, दहावी, बारावीच्या परीक्षांची विद्यार्थ्यांना चिंता असते. या परीक्षामुळे बहुतांश विद्यार्थी तणावात असतात. यामुळे काही विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर शिक्षण अर्धवट सोडतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा सेमिस्टर पॅटर्न प्रस्तावित केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मंत्रालयाने या सेमिस्टर पॅटर्नसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, पालक, शिक्षक, अभ्यासकांची मते मागवली आहेत. मंत्रालयाने परीक्षेच्या संदर्भाती विविध प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालय या सर्व प्रश्नांच्या उत्तरावरून येत्या २ वर्षांवरून नव्या पद्धतीचा अवंलब करणार आहे.
नवीन अभ्यासक्रमात पुस्तकातील मजकूर कमी करण्यात येणार आहे. त्याऐवजी मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दहावी- बारावीच्या परीक्षेचं पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेतले जाणार आहे. तर दुसरं सत्र मार्च महिन्यात घेतले जाईल. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा देखील पार पडेल.
त्यानंतर दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.