गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या हल्ल्यात दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले आहेत. या दहशतवादी कारवायावरून शिवसेना ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका केली आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीका करताना सामना अग्रलेखात म्हटलं की, 'आगामी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका म्हणजे मोदी-शहांसाठी युद्धभूमीच झाली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ 5 राज्यांच्या युद्धभूमीवर उतरले आहे. मोदी-शहा भाजप विजयासाठी प्रचारात दंग असताना जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भारतीय लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले आहेत'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'दहशतवाद मोडून काढण्यासाठी 'नोटाबंदी'चा जालीम उपाय मोदी यांनी केला. अतिरेकी दोन हजारांच्या बनावट नोटा छापून चलनात आणतात म्हणून त्या गुलाबी नोटाही बंद केल्या, तरी खोऱ्यात जवानांच्या रक्ताचे सडे पडणे काही थांबलेले नाही. कारण मोदी-शहांना कश्मीर प्रश्नाचे फक्त राजकारण करायचे आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली.
'कश्मिरी पंडितांच्या घर वापसीचे वचन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत देणारे मोदी-शहा नंतर तेथे फिरकलेच नाहीत. कश्मीर समस्येवर तोडगा नाही. त्यात मणिपूरही अद्याप पेटलेलेच आहे. मोदी-शहा हे मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडची राजकीय लढाई जिंकायला उतरले आहेत. मोदी-शहा मणिपूर समस्येवर बोलायला तयार नाहीत, कश्मीर समस्येवर बोलत नाहीत, असा टीकेचा बाणही ठाकरे गटाने सोडला.
'कश्मीरात अतिरेक्यांकडे शस्त्र आहेत. मणिपुरात जनतेकडे शस्त्र आहेत. मात्र, सरकार एकतर 'मोदी' स्टेडियमवर वर्ल्ड कपच्या मैदानात, नाहीतर पाच राज्यांतील निवडणुकांच्या मैदानात राजकीय विरोधकांवर हल्ले करीत आहे. देश धोक्यात आहे व राष्ट्राची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे हे चित्र आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
'शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा आहे, पण...';ठाकरे गटाची टीका
'कश्मीरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक पोलीस, लष्करी अधिकारी, जवानांचे बळी गेले. याबाबत सरकारला त्याची ना खंत ना खेद आहे. त्यांना काँगेसमुक्त भारत, शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा आहे, पण दहशतवादमुक्त कश्मीर आणि मणिपूर करायचे नाही, असे खडेबोल ठाकरे गटाने मोदी सरकारला सुनावले.
'राजौरीत दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन कॅप्टन व दोन जवान पुन्हा बलिदानाच्या वेदीवर चढले. कश्मीरमध्ये पुनः पुन्हा जवानांचे रक्त सांडत आहे. पण दिल्लीला चढलेली सत्तेची व निवडणुकांची नशा उतरत नाही, असा हल्लाबोलही ठाकरे गटाने केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.