Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्री महाराजांवर गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी; काय आहे प्रकरण?

Pune News : अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे.
Bageshwar Dham
Bageshwar DhamSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News :

बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अंनिसने याबाबत पोलिसांना निवेदन देखील दिलं आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे.

धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले, असा आरोप महाराष्ट्र अंनिसने केला आहे. महाराष्ट्र अंनिसने मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bageshwar Dham
Mumbai Crime News: अमली पदार्थांसाठी पोटच्या मुलांना विकलं; मुंबईमधील संतापजनक घटना

वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी देखील अंनिसने केली आहे.  (Latest Marathi News)

Bageshwar Dham
Mumbai News : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कोर्टाकडे अजब मागणी; अर्ज केला दाखल

धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी अंनिसने केली आहे. अंनिसच्या मागणीनंतर आता पोलीस काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com