ICC New Rules, WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे.
आयसीसीने काही दिवसांपूर्वी नवे नियम जाहीर केले आहेत. जे १ जून पासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील काही नवीन नियम पाहायला मिळणार आहेत. कोणते आहेत ते नियम? जाणून घ्या.
सॉफ्ट सिग्नलचा नियम नेहमीच खेळाडूंना आणि क्रिकेट चाहत्यांना नडला आहे. या नियामुळे अनेकदा फलंदाजाला बाद नसतानाही मैदान सोडावं लागलं आहे. तर काही फलंदाज बाद असूनही बाद असूनही त्यांना नाबाद घोषित केलं गेलं आहे.
आता या नियमात बदल केला गेला आहे. १ जूनपासून सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द करण्यात आला आहे. आता मैदानावर असलेले अंपायर सॉफ्ट सिग्नल न देता तिसऱ्या अंपायरकडे निर्णय पाठवणार आहे.
यासह हेल्मेट घालण्याच्या नियमात देखील मोठा बदल करण्यात आला आहे. १ जूनपासून आयसीसीने हेल्मेट घालणं बंधनकारक केलं आहे. फलंदाज जेव्हा वेगवान गोलंदाजांचा सामना करतात त्यावेळी हेल्मेट घालतात.
मात्र जेव्हा फिरकी गोलंदाज येतात तेव्हा काही फलंदाज हेल्मेट शिवाय खेळण्याचं धाडस करतात. तसेच अनेकदा यष्टीरक्षक देखील हेल्मेट न घालता यष्टिरक्षण करण्याचं धाडस करतात. मात्र आता हेल्मेट घालणं बंधनकारक केलं आहे. याशिवाय फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षण करतात हेल्मेट घालावं लागणार आहे. (Latest sports updates)
१) वेगवान गोलंदाजांचा सामना करताना हेल्मेट घालणं बंधनकारक.
२) वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असताना यष्टीरक्षक यष्टीच्या अगदी जवळून यष्टिरक्षण करत असेल तर त्याने हेल्मेट घालणं गरजेचं आहे.
३) जे क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण करत असतील तर, त्यांना देखील हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.