Team India Playing 11: WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग ११ जाहीर! दिग्गजाने धाकड फलंदाजाला ठेवलं संघाबाहेर

Sunil Gavaskar Playing 11: भारत आणि ऑसट्रेलिया या दोन्ही संघामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे
team india
team india saam tv
Published On

Ind vs Aus WTC Final 2023 : भारत आणि ऑसट्रेलिया या दोन्ही संघामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यापूर्वी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान या सामन्यासाठी माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे.

team india
WTC Final: WTC चा अंतिम सामना ड्रॉ झाल्यास कोण होणार वर्ल्ड चॅम्पियन?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सुनील गावसकरांनी निवडली प्लेइंग ११...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सुनील गावसकर यांनी प्लेइंग ११ निवडली आहे. या संघात त्यांनी एकापेक्षा एक सरस खेळाडूंना संधी दिली आहे. या संघात त्यांनी अशा काही खेळाडूंना संधी दिली आहे, जे एकट्याच्या बळावर संघाला सामना जिंकून देऊ शकतात.

ओपनर..

सुनील गावसकर यांनी ओपनर म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची निवड केली आहे. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार आहे. तर डावाची सुरुवात करण्यासाठी त्याला शुभमन गिलची साथ मिळणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी चेतेश्वर पुजारा तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी रनमशीन विराट कोहलीची निवड केली आहे.

५ ते ७ क्रमांकासाठी या खेळाडूंची केली निवड..

सुनील गावसकर यांनी निवडलेल्या प्लेइंग ११ मध्ये पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेची निवड केली आहे. अजिंक्य रहाणेला इंग्लंडमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी केएस भरतची निवड केली आहे. सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी रविंद्र जडेजाला संधी दिली आहे. (Latest sports updates)

team india
WTC Final: रोहित शर्माच्या चिंतेत वाढ! WTC च्या अंतिम सामन्यात दिग्गज खेळाडूंशिवाय उतरावं लागणार मैदानात

वेगवान गोलंदाज..

तर वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी या संघात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरची निवड केली आहे.

फिरकी गोलंदाज..

सुनील गावसकर यांनी फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनला संघात स्थान दिलं आहे.

अशी आहे सुनील गावसकर यांनी निवडलेली प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com