Josh Hazlewood Injured: WTC अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; एकहाती सामना जिंकवणारा वेगवान गोलंदाज संघाबाहेर

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.
Josh Hazlewood Injured
Josh Hazlewood InjuredSaam tv
Published On

Josh Hazlewood News: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. जोश दुखापतीमुळे अनेक दिवसांपासून त्रस्त होता, आयसीसीने ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

हेजलवूड आयपीएल २०२३ स्पर्धेत जखमी झाला होता. हेजलवूड आरसीबीचा तगडा खेळाडू आहे. जोश जखमी झाल्याने यंदाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळणार नाही. यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. हेजलवुड संघाबाहेर गेल्याने ऑस्ट्रेलियाचा मायकल नेसरला संघात स्थान मिळालं आहे.

दरम्यान, हेजलवूडने आयपीएल स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत. या स्पर्धेत हेजलवूडने एकूण ३ गडी बाद केले होते. तर मुंबईच्या विरुद्ध खेळलेल्या सामन्यात हेजलवुडने ३ षटकात ३२ धावा दिल्या होत्या. मात्र, एकही विकेट त्याला मिळाला नव्हता.

आयपीएल २०२३ मध्येही उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे बाहेर पडला होता. हेझलवूडला आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले. मात्र, जोश दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.

हेझलवूडच्या जागी खेळणारा नेसर कोण आहे?

३३ वर्षीय मायकेल नेसरने ऑस्ट्रेलियाकडून दोन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळले आहेत. नेसर हा अलीकडेच इंग्लिश कंट्री चॅम्पियनशिपमध्ये ग्लॅमॉर्गनसाठी चांगला फॉर्ममध्ये आहे. त्याने ५ सामन्यात १ बळी घेतला आहे.

Josh Hazlewood Injured
Team India: टीम इंडियासाठी २१२ विकेट्स घेणारा 'हा' गोलंदाज अजूनही पाहतोय कसोटी पदार्पणाची वाट

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com