Team India: टीम इंडियासाठी २१२ विकेट्स घेणारा 'हा' गोलंदाज अजूनही पाहतोय कसोटी पदार्पणाची वाट

Yuzvendra Chahal : जाणून घ्या कोण आहे तो गोलंदाज.
team india
team indiasaam tv
Published On

Indian Test Team: कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट आहे. प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की त्याने एकदा तरी आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळावं. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर काहीचं कसोटी फॉरमॅट खेळण्याचं स्वप्नं अपूर्ण राहून जातं.

भारतीय संघात देखील असा एक गोलंदाज आहे, जो गेल्या ७ वर्षांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय. इतकेच नव्हे तर सातत्याने चांगली कामगिरी देखील करतोय. मात्र त्याला अजूनही कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली नाही जाणून घ्या कोण आहे तो गोलंदाज.

team india
WTC Final: 'आमच्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली..' ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या वक्तव्याने खळबळ

आयपीएल २०१६ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने एक हिरा शोधून काढला होता. हा हिरा म्हणजे लेग स्पिनर युझवेंद्र चहल. आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करत त्याने भारतीय संघात स्थान मिळवलं होतं.

त्याने वनडे आणि टी-२० संघाचे प्रतिनिधित्व करताना भारतीय संघाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. टी -२० क्रिकेटमध्ये तो भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी..

युझवेंद्र चहलला २०१६ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. याच वर्षी त्याला टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत खेळलेल्या ७२ वनडे सामन्यांमध्ये १२१ गडी बाद केले आहेत. तर ७५ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ९१ गडी बाद केले आहेत. जोरदार कामगिरी करूनही त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाहीये. (Latest sports updates)

team india
WTC Final: रोहित शर्माच्या चिंतेत वाढ! WTC च्या अंतिम सामन्यात दिग्गज खेळाडूंशिवाय उतरावं लागणार मैदानात

आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज..

युझवेंद्र चहल हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या ड्वेन ब्रावोला मागे सोडलं आहे. ब्रावोने १८३ गडी बाद केले होते. तर युझवेंद्र चहलने १८७ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com