slogan against Gambhir saam tv
Sports

पराभवानंतर गंभीर विरोधात 'हाय-हाय'चा नारा, स्टेडिममध्ये वातावरण तापलेलं असताना सिराजने केलं असं की...! Video

IND vs SA Test Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी कसोटी सामन्यातील दारूण पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या ऐतिहासिक 'व्हाइटवॉश' नंतर चाहत्यांचा संताप शिगेला पोहोचला आणि त्याचे थेट प्रदर्शन मैदानावर पाहायला मिळाले.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दोन सामन्यांची टेस्ट सिरीज भारतीय क्रिकेट इतिहासातील वाईट आठवणींमधील एक ठरली. या सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 ने क्लीन स्वीप देत तब्बल २५ वर्षांनी भारताला पराभूत केलं आहे. गुवाहाटी टेस्टमध्ये भारत 408 रन्सने पराभव स्विकारावा लागला. हा पराभव टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा रन्सच्या फरकाने सर्वात मोठा पराभव होता.

गुवाहाटीत चाहत्यांनी व्यक्त संताप

इतक्या मोठ्या पराभवानंतर गुवाहाटीच्या मैदानात वातावरण तापलेलं दिसून आलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसलं की, प्रेक्षकांनी भारतीय हेड कोच गौतम गंभीर यांच्या विरोधात स्टँडमधून “हाय-हाय” अशा घोषणा दिल्या. टीम इंडियाचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफ मैदानात उपस्थित असताना चाहत्यांनी या घोषणा दिल्या.

सिराजने जिंकली सर्वांची मनं

याच दरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने असं पाऊल उचललं ज्याने सर्वांची मन जिंकली. सिराजने चाहत्यांकडे पाहून तोंडावर बोट ठेवत त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. त्याचा हा इशारा स्पष्टपणे दाखवत होता की, ते हेड कोच गंभीरसोबत असं वागणं योग्य नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून सिराजचे सर्वत्र कौतुक होतंय.

गौतम गंभीरच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह

गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून टीम इंडियाचा टेस्ट रेकॉर्ड फारसा चांगला झालेला नाही. आतापर्यंत भारताने गंभीरच्या कोचिंगखाली 19 टेस्ट सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 जिंकले, 10 हरले आणि 2 सामने ड्रॉ राहिले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये मिळणाऱ्या या सतत्या पराभवानंतर टीकाकारांचं म्हणणं की, टीमला नवीन रणनीती आणि मजबूत नियोजनाची गरज आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दारूण पराभवानंतर गंभीर याच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषतः घरच्या मैदानावर क्लीन स्वीप मिळणं स्वीकारार्ह नसल्याने त्याला हटवण्याची मागणी केली जातेय. यानंतर आता टीम इंडिया पुढील टेस्ट सिरीज 2026 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवसेनेची कोल्हापुरात बाईक रॅली

राजकारण तापलं; वंचितच्या रॅलीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न, सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप, VIDEO

Aawaj Maharashtracha Nagpur: 'पदवी आहे, पण नोकरी नाही'; नागपूरच्या तरुणांचा राजकारण्यांना सवाल

ग्रीनलँडमध्ये “I Love You” कसं म्हणतात? शब्द वाचून व्हाल चकीत

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूच, आणखी एका तरुणाला विष देऊन मारलं

SCROLL FOR NEXT