shubman gill catch twitter
Sports

Shubman Gill Catch: गिलने पंतला बाद करण्यासाठी मागे धावत घेतला भन्नाट कॅच, अन् पुढच्याच बॉलवर...

Shubman Gill Catch Video: शुभमन गिलने रिषभ पंतला बाद करण्यासाठी एक भन्नाट कॅच घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील पहिल्या दिवशी चारही संघ अॅक्शनमध्ये आहेत. बंगळुरुमध्ये इंडिया ए आणि इंडिया बी हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजांनी संथ खेळ केला.

त्यानंतर जेव्हा रिषभ पंत फलंदाजीला आला, तेव्हा वाटलं होतं की, आता आक्रमक फलंदाजी होणार. मात्र कर्णधार शुभमन गिलने मागच्या दिशेने धावत शानदार कॅच घेतला. जे पाहून रिषभ पंतही शॉक झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंडिया ए संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि अभिमन्यू ईश्वरनला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही.

दरम्यान रिषभ पंतवर खेळपट्टीवर टीचून राहण्याची आणि मोठी खेळी खेळण्याची जबाबदारी होती. मात्र तो अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

तर झाले असे की, इंडिया बी संघाकडून ३६ वे षटक टाकण्याची जबाबदारी आकाश दीपकडे सोपवण्यात आली होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रिषभ पंतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू लांब न जाता हवेत उंच गेला. त्यावेळी शुभमन गिलने मागच्या दिशेने धावत शानदार कॅच घेतला. या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पंतला बाद केल्यानंतर आकाश दीपने पुढच्याच चेंडूवर रेड्डीची दांडी गुल केली.

असे आहेत दोन्ही संघ:

इंडिया ए संघ

मयंक अग्रवाल, शाश्वत रावत, शुभमन गिल, तिलक वर्मा, रियान पराग, शिवम दुबे, तनुष कोटियन, ध्रुव जुरेल, के.एल. राहुल, कुमार कुशाग्र, आकाश दीप, आवेश खान, खलील अहमद, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, विद्वत कावेरीप्पा.

इंडिया बी संघ:

अभिमन्यू ईश्वरन, सरफराज खान, यशस्वी जयस्वाल, के. नितीश कुमार रेड्डी, मुशीर खान, वॉशिंग्टन सुंदर, नारायण जगदीसन, ऋषभ पंत, मोहित अवस्थी, मुकेश कुमार, नवदीप सैनी, राहुल चहर, साई किशोर, यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT