Shubman gill statement after defeat against royal challengers bangalore reveals the reason behind defeat  saam tv news
क्रीडा

Shubman Gill Statement: गुजरातचं नेमकं चुकतय तरी कुठं? कर्णधार शुभमन गिलने सांगितली पराभवाची कारणं

GT vs RCB,IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर गिलने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या गुजरात टायटन्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोर विजयासाठी २०१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ९ गडी आणि ४ षटक शिल्लक ठेऊन जिंकला. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

गुजरात टायटन्स संघाकडून कर्णधार शुभमन गिल फलंदाजीत योगदान देतोय मात्र या संघातील गोलंदाज हवी तशी कामगिरी करु शकलेले नाहीत. त्यामुळेच या संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार गिलने पराभवाचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला की, 'मला वाटतं की, त्यांच्या शानदार फलंदाजीने आम्हाला सामन्यातून दुर नेलं. आम्हाला यापुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये आणखी चांगली योजना बनवून मैदानात उतरावं लागेल.

काय आहे पराभवाचं कारण?

पराभवाचं कारण सांगताना शुभमन गिल म्हणाला की,' आम्हाला आणखी चांगल्या प्लानिंगसह मैदानात उतरावं लागेल. शेवटी २० षटकात किती धावा केल्या हेच महत्वाचं आहे. आम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेऊ शकलो नाही. जेव्हा आपण फलंदाजी करत असतो, तेव्हा नेहमीच १५ -५० धावा अधिकच्या करायच्या हेच डोक्यात असतं. मात्र आम्हाला हवं होतं, तसं काहीच झालं नाही. आम्हाला वाटलं होतं की, २०० धावा खूप होतील. मात्र दुर्देवाने असं काहीच झालं नाही. आम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट्स काढण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे माझ्या मते हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट होता.'

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने २० षटकअखेर ३ गडी बाद २०० धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विल जॅक्सने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

SCROLL FOR NEXT