Ind vs Eng 2nd Test Match, Shubman Gill Update News in Marathi SAAM TV
Sports

Shubman Gill Injury : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; शतकवीर शुभमन गिल दुखापतीमुळं मैदानाबाहेर

Big blow for Team India Centurion player Shubman Gill out due to injury; टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. दुसऱ्या कसोटीत शतक ठोकून टीम इंडियाला सुस्थितीत नेणारा शुभमन गिल याला दुखापत झाली आहे.

Nandkumar Joshi

Ind vs Eng 2nd Test Match, Shubman Gill Update News :

विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियासाठी वाईट बातमी येऊन धडकली आहे. या वृत्तानं टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. दुसऱ्या कसोटीत शतक ठोकून टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेणारा शुभमन गिल जायबंदी झाला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शुभमन गिल (Shubman Gill) याने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावलं. फॉर्म गमावलेल्या शुभमनला अखेर सूर गवसला. त्यानं झळकावलेल्या शतकाच्या बळावर टीम इंडियाला इंग्लंडसमोर ३९९ धावांचं आव्हान ठेवता आलं. (Latest Marathi News)

टीम इंडियाचं (Team India) हे लक्ष्य पार करून विजय साकारण्याचा इंग्लंड संघाचा मानस असेल. पण त्यांना रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. चौथ्या दिवशी टीम इंडिया मैदानात उतरली खरी, पण त्यात शुभमन दिसला नाही. वृत्तानुसार, त्याला दुखापत झाली आहे आणि मैदानात उतरणंही त्याच्यासाठी मुश्किल झालं आहे.

शुभमन गिलनं (Shubman Gill Injury) तर काल, रविवारी शतक झळकावलं, मग दुखापत झाली कधी ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलला दुखापत झाली होती. तो क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी गिलच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. दुखापत झाली असली तरी, त्यानं दुसऱ्या डावात फलंदाजी करत शानदार शतकी खेळी केली. पण चौथ्या दिवशी त्याला याच दुखापतीमुळं क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरता आलं नाही.

शुभमनऐवजी सरफराज खान मैदानात

शुभमन गिल मैदानात आला नाही. त्याच्या जागी सरफराज खान मैदानात उतरला आहे. विशाखापट्टणममध्ये कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला रोखण्यासाठी टीम इंडियाचे ११ खेळाडू मैदानात उतरले. त्यात सरफराज खानही होता.

गिलची दुखापत किती गंभीर?

शुभमन गिलचा सूर हरवल्यानं प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान द्यायला नको, असं चाहते म्हणत होते. त्याचवेळी टीम इंडियाचे अनेक माजी खेळाडूही आणि क्रिकेटचे जाणकारही गिलबद्दल प्रश्न उपस्थित करत होते. अशावेळी दुसऱ्या कसोटीत शतक झळकावून शुभमननं वापसी केली. पण आता त्याला दुखापतीनं घेरलं आहे. ही दुखापत फार गंभीर असायला नको. तिसऱ्या कसोटीसाठी त्याचं संघात असणं महत्वाचं मानलं जातं. तो उत्तम क्षेत्ररक्षक आहेच, शिवाय तगडा फलंदाजही आहे. आता त्याची दुखापत किती गंभीर आहे, तो पुन्हा मैदानात उतरू शकेल का, याबाबत अद्याप काहीच ठोस माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party Case: मोठी अपडेट! एप्रिल-मे महिन्यातही त्याच हॉटेलमध्ये झाली होती पार्टी; कोण- कोण होत होणार तपास

Maharashtra Live News Update: मुख्य निरीक्षण अधिकारी 1.75 लाखांची लाच घेताना ACB च्या सापळ्यात अडकला

Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT