Ind vs Eng 2nd Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला! शुभमनचा शतकी धमाका; इंग्लडसमोर विजयासाठी ३३२ धावांचं आव्हान

India Vs England Test: दिवसाच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडियाचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला. दोन्ही डावात फलंदाजी केल्यानंतर भारताने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 1 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत.
India Vs England Test
India Vs England TestSaamtv

IND Vs ENG 2nd Test Match 3rd Day Update:

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १ विकेट गमावत ६७ धावा केल्या आहेत. पहिली विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने रेहान अहमदला नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आणि तो विकेट वाचवण्यात यशस्वी ठरला. तत्पुर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने दमदार शतक झळकावत तिसरा दिवस गाजवला.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या (India) दुसऱ्या डावाने झाली. दिवसाच्या सुरूवातीला यशस्वी जैस्वाल 17 चेंडूत 15 धावा आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 19 चेंडूत 13 धावांवर खेळत होता. मात्र तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला10 विकेट्सच्या मोबदल्यात 227 धावाच करता आल्या.

यामध्ये एकट्या शुभमन गिलने (Shubhman Gill) १०४ धावांची दमदार खेळी केली. यामध्ये त्याने 147 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. शुभमन गिल वगळता एकाही भारतीय खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडकडून फिरकीपटू टॉम हार्टलीने सर्वाधिक ३ बळी घेतले.

India Vs England Test
Virat Kohli Centuries: संघाबाहेर बसलेल्या विराट कोहलीला मोठा धक्का; कसोटी शतकांमध्ये 'या' खेळाडूने टाकलं मागे

दिवसाच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडियाचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला. दोन्ही डावात फलंदाजी केल्यानंतर भारताने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 1 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या दोन दिवसात त्यांना विजयासाठी 9 विकेट्सवर 332 धावांची गरज आहे. (Latest Cricket News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India Vs England Test
Virar Kohali : विराट कोहली होणार पुन्हा बाबा; अनुष्का देणार गोड बातमी; AB डिव्हिलियर्सनं सांगितली खुशखबर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com