Shubman Gill saam tv
Sports

Shubman Gill: 2027 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार का? कर्णधार शुभमन गिलने एका वाक्यात दिलं उत्तर

India vs England ODI: 2027 वनडे वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या योजनांचा महत्त्वाचा भाग असल्याचं शुभमन गिलने स्पष्ट केलं. अनुभवी खेळाडूंची भूमिका, युवा खेळाडूंना संधी आणि भारत-इंग्लंड वनडे मालिकेपूर्वीच्या महत्त्वाच्या वक्तव्याची माहिती जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय टेस्ट आणि वनडे टीमला कर्णधार शुभमन गिल याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्याबाबत महत्त्वाची माहिती दिलीये. 2027 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही अनुभवी खेळाडू भारतीय टीमचा भाग असतील का याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरूये. बीसीसीआयकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र गिलच्या वक्तव्यानंतर या चर्चेला नवं वळण मिळालंय.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना आज म्हणजेच मंगळवारी 14 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शुभमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली.

गिल म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघंही भारताच्या 2027 वर्ल्डकच्या नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहेत. टीममध्ये त्यांच्यासारखे अनुभवी फलंदाज असणं ही मोठी ताकद असल्याचं त्याने म्हटलंय.

यावेळी गिल म्हणाला, "विराट भाई आणि भाई भाऊ गेल्या दहा वर्षांपासून भारतीय फलंदाजीचा मजबूत आधार आहेत. ते आमच्या टीमसाठी खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांच्याकडे असलेली क्वालिटी ही टीमसाठी अमूल्य आहे. गेल्या दशकात त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत, मोठ्या सामन्यांमध्ये आणि विविध स्पर्धांमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे."

2027 च्या वर्ल्डकपसाठी टीमची बांधणी कशी केली जात आहे यावरही गिलने भाष्य केलं. तो म्हणाला, "दडपणाच्या क्षणी अनुभवी खेळाडूंची भूमिका खूप महत्त्वाची असते. अशा प्रसंगांना ते अनेकदा सामोरे गेलेले असतात. त्यांनी यशही पाहिल आहे आणि अपयशही अनुभवलंय. त्यामुळे त्यांचा अनुभव टीमसाठी मोलाचा ठरतो."

यासोबतच गिलने तरुण खेळाडूंनाही संधी देण्याची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, "टीमचा मुख्य गट कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र त्याच वेळी युवा खेळाडूंनाही संधी मिळावी, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव मिळावा, यावरही आमचा भर आहे. आमची प्लेइंग इलेव्हन अनिश्चित आहे असं मला वाटत नाही. पण भविष्यासाठी तरुणांना तयार करणंही तितकंच गरजेचं आहे."

भारत-इंग्लंड पहिली वनडे

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सिरीजमधील पहिली वनडे बर्मिंगहॅममध्ये मंगळवारी 14 जुलै रोजी खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. टी-20 सिरीजमध्ये भारताला 0-4 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता वनडे सिरीजमध्ये विजय मिळवून कमबॅक करण्याचा टीमचा प्रयत्न असेल.

पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि गुरनूर बराड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT