

यस्तिका भाटियाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली.
क्रांतीने पाच विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवत देशाचा मान उंचावला.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाला असताना भारतीय महिला संघानं देशाचं नाव मोठं केलंय. टी२० मालिकेत पुरुषाच्या संघाने ०-४ अशी मालिका गमावली. त्यामुळे टीम इंडिया टीकेची धनी बनलीय. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. तर दुसरीकडे हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला संघानं लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवलाय.
भारतीय महिला संघानं २७० धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवत एक इतिहास नोंदवलाय. यस्तिका भाटियाचे शानदार शतक आणि भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी यांच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत मात दिली. भारताने ७ गडी गमावत ३४१ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.
त्यानंतर इंग्लंडसमोर ४५७ धावांचे मोठं आव्हान ठेवलं. याला प्रत्युत्तर देताना यजमान संघ १८६ धावांमध्ये गारद झाला. इंग्लंडने सोमवारी ६ विकेट गमावत १३० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. हा विजय विशेष महत्त्वाचा ठरला कारण लॉर्ड्ससारख्या प्रतिष्ठित मैदानावर भारतीय महिला संघाने प्रत्येक बाबतीत इंग्लंडपेक्षा सरस कामगिरी केली.
भारतीय संघाच्या या विजयात यष्टिरक्षक-फलंदाज यस्तिका भाटिया हिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिने शानदार ११३ धावांची खेळी केली. तिने कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले. प्रतिष्ठित 'लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड'वर आपले नाव कोरले. यस्तिकाने १४५ चेंडूंत हा टप्पा गाठला आणि आपल्या खेळीदरम्यान १४ चौकार लगावले. यासह रिचा घोषने ५० धावांची धडाकेबाज नाबाद खेळी केली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाने ७ विकेट गमावले असताना ३४१ धावसंख्येवर डाव घोषित केला.
भारताच्या दुसऱ्या डावात इंग्लंडची आघाडीची फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने ३३.३ षटकांत ११८ धावा देत पाच बळी घेतले. तिच्या कसोटी कारकिर्दीतील एका डावात पाच बळी घेण्याची ही चौथी वेळ होती. तिने या सामन्यात एकूण आठ बळी घेतले, तरीही तिच्या या कामगिरीमुळे इंग्लंडला पराभवापासून वाचवता आले नाही.
भारताने दिलेल्या ४५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. यात पहिल्या डावात पाच बळी घेत 'लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड'वर आपले नाव कोरणाऱ्या क्रांती गौडने दुसऱ्या डावातही कहर केला. तिने अगदी पहिल्याच षटकात टॅमी ब्यूमंटला शून्यावर बाद केले. ब्यूमंटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा डाव होता. ती मैदानाबाहेर जात असताना भारतीय खेळाडूंनी तिला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.