shreyas iyer twitter
Sports

Shreyas Iyer Dance: हे नाही पाहिलं तर काय पाहिलं..टीम इंडिया चॅम्पियन बनताच श्रेयसचा ‘अय्यर’ स्टाईल भन्नाट डान्स –VIDEO

Shreyas Iyer Dance After Team India Won Icc Champions Trophy: भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर भन्नाट डान्स करताना दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

Ankush Dhavre

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना जिंकल्यानंतर कोट्यवधी क्रिकेट फॅन्स जल्लोष करताना दिसून आले. संपूर्ण देशात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.

तर खेळाडू मैदानावरच डान्स करताना दिसून आले. दरम्यान श्रेयस अय्यरने केलेल्या डान्सनंतर २०१३ मध्ये विराट कोहलीने केलेल्या सेलिब्रेशनची आठवण करून दिली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

जेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूची सेलिब्रेशन करण्याची स्टाईल जरा हटके असते. काही खेळाडू शॅम्पेनची बॉटल घेऊन सेलिब्रेशन करतात. तर काही खेळाडू देशाचा झेंडा घेतात आणि मैदानाची प्रदक्षिणा घालून फॅन्सचे आभार मानतात. तर काही खेळाडू डान्स करून आपला आनंद व्यक्त करताना दिसून येतात. श्रेयस अय्यरने देखील असाच काहीसा डान्स केला.

चॅम्पियन बनताच भारतीय संघाचा डान्स

भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. यासह तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. भारतीय खेळाडू पांढऱ्या रंगाचं ब्लेजर परिधान करून ट्रॉफी घेण्यासाठी आले. ट्रॉफी घेताच भारतीय खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळाला. श्रेयस अय्यर पुढे येऊन हटके डान्स स्टेप्स करताना दिसून आला. यापूर्वी २०१३ जेव्हा भारतीय संघाने विजय मिळवला होता, त्यावेळी विराट कोहली गंगनम स्टाईल डान्स करताना दिसून आला होता. आता ही परंपरा श्रेयस अय्यरने कायम ठेवली आहे.

श्रेयस अय्यरने केलेला डान्स पाहून तुम्हाला नक्कीच तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील अय्यरची आठवण झाली असेल. अय्यर देखील अनेकदा असाच डान्स करताना दिसून आला आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संपूर्ण स्पर्धेत श्रेयस अय्यरची बॅट चांगलीच तळपली. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा दुसरा, तर भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT