India cricket team saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi: इंग्लंडविरूद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? अखेर कर्णधार श्रेयस अय्यरने दिलं उत्तर

India cricket team: भारत-इंग्लंड टी20 मालिकेआधी कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूबाबत स्पष्ट उत्तर देणं टाळलं. त्याने टीम संतुलन, अनुभवी खेळाडू आणि सुरक्षित वातावरणावर भर दिला असून, अंतिम प्लेइंग इलेव्हन गोपनीय ठेवली जाते असे सांगितले.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट टीममध्ये नव्या आणि तरुण खेळाडूंना संधी देण्यावरून सुरू असलेली चर्चा पुन्हा एकदा रंगलीये. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूबाबत थेट उत्तर देणं टाळलंय. पण टीममधील संतुलन, अनुभवी खेळाडूंचा आधार आणि सुरक्षित वातावरण यावर त्यांने भर दिलाय.

वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूवर काय म्हणाला कर्णधार?

15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी याचा A टीममध्ये समावेश झाल्यापासून त्याच्या डेब्यूची मागणी जोर धरू लागली आहे. त्याला संधी द्यायची झाल्यास संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची जोडी किंवा संयोजन बदलावं लागेल, अशी चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर श्रेयस अय्यर म्हणाला की, टीममध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीये. त्यामुळे फक्त एका खेळाडूवर निर्णय घेता येत नाही. प्रत्येक खेळाडूला संधी आणि सुरक्षित वातावरण देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास टिकून राहील.

श्रेयसने पुढे सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी टी20 वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूंना टी20 क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. ते या फॉरमॅटमध्ये भारताचा मजबूत आधारस्तंभ राहिलेत.

वैभव सूर्यवंशीला पुढच्या सामन्यात डेब्यू मिळणार का, यावर थेट उत्तर देताना अय्यर म्हणाला की, कोणालाही याची खात्रीलायक माहिती नाहीये. टीम काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही, कारण ही माहिती गोपनीय ठेवली जाते.

या विषयावर चर्चा होते, पण फायनल प्लेइंग इलेव्हन आधीच जाहीर केल्यास विरोधी टीमला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे रणनीती गुप्त ठेवली जाते. सूर्यवंशी हा युवा खेळाडू आहे आणि त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही श्रेयसने व्यक्त केलाय.

सोशल मीडियावरील चर्चेबाबत अय्यरचा खुलासा

वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, मी अशी कोणतीही गोष्ट पाहिलेली नाही. मी स्वतः बातम्या फार पाहत नाहीत आणि सोशल मीडियापासूनही दूर राहतो. त्यामुळे मला अशा चर्चांची माहिती नाही.

आयर्लंडविरुद्धच्या पराभवावर प्रतिक्रिया

आयरलँड दौऱ्यात झालेल्या पराभवाबाबत बोलताना अय्यर म्हणाला की, तो पराभव लाजिरवाणा नव्हता, पण नक्कीच निराशाजनक होता. कारण टीने असा विचार केला नव्हता की आयर्लंड इतकी चांगली कामगिरी करेल. दरम्यान या सिरीजमधून खूप शिकायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंदापुरातील मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन अखेर मागे

Skincare Tips : फक्त चहासाठीच नाही! गोकर्णाचं फूल त्वचेसाठीही ठरतं फायदेशीर

Jayanti 2: कॉलेजमधील रॅगिंग, जातीभेदाचा थरार उलगडणार; 'जयंती २'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Hair Cut: सुंदर आणि स्टायलिश दिसायचंय? मग, फेस शेपनुसार मुलींनी निवडावा 'हे' हेअरकट

CM फडणवीसांकडून DJ बंदीचे संकेत, नागरिकांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT