Captain Shreyas Iyer Statement SAAM TV
Sports

Shreyas Iyer : कोलकात्याला धूळ चारल्यानंतर अय्यरचं खास सेलिब्रेशन, विजयानंतर सांगितलं KKR ला कसं फसवलं जाळ्यात, म्हणाला...!

Captain Shreyas Iyer Statement: मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला धूळ चारली. या सामन्यात कोलकात्याच्या टीमला जिंकण्यासाठी ११२ रन्सचं टार्गेट देण्यात आलं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने इंडियन प्रिमीयर लीगच्या ३१ व्या सामन्यात कमाल केली. पंजाब किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या रंगलेल्या या सामन्यात कोलकात्याची टीम अवघ्या ९५ रन्समध्ये ऑलआऊट झाली. अय्यरसाठी हा विजय खूप खास होता कारण हा वीज त्याने त्याच्या माजी फ्रेंचायझीविरूद्ध मिळवला होता. या विजयानंतर अय्यरने स्पेशल पद्धतीने सेलिब्रेशन केलं.

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जलाही साजेसा खेळ करता आला नाही. या सामन्यात पंजाबची टीमला १११ रन्स करता आले. यानंतर कोलकात्याला जिंकण्यासाठी ११२ रन्सचं टार्गेट देण्यात आलं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली केकेआरची टीम १५.१ ओव्हरमध्ये ९५ रन्सवर पव्हेलियमध्ये परतली.

विजयानंतर काय म्हणाला श्रेयस अय्यर?

कोलकात्याविरूद्ध मिळवलेल्या विजयानंतर अय्यर म्हणाला की, माझ्यासाठी हे शब्दांमध्ये मांडणं फार कठीण आहे. मी फक्त त्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत होतो, ज्यावर आम्ही करू शकत होतो. बॉल स्पिन होतोय हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी युजवेंद्रला म्हटलं की, तुला तुझ्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. अशामध्ये मी आक्रमक फील्डिंग लावली. अशा पद्धतीचा विजय तुमच्यासाठी खूप खास असतो, त्यामुळे तो पचवणं माझ्यासाठी खूप कठीण आहे.

केकेआरला कसं फसवलं जाण्यात?

११२ चं लक्ष्य पार करणं फारशी मोठी गोष्ट नव्हती. मात्र तरीही केकेआरच्या टीमला हा सामना जिंकणं शक्य झालं नाही. यावेळी केकेआरविषयी बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, ज्यावेळी मी फलंदाजी करत होते तेव्हा मला जाणवलं की, बॉल वेगळ्या पद्धतीने बाऊंस होतोय. बाऊंस होऊन तो खालच्या दिशेने जात होता. अशा परिस्थितीत स्विप मारणं कठीण जात होतं. त्यावेळी मला वाटलं की, आम्ही जितके रन्स बनवलेत ते पुरेसे आहेत. त्यामुळे आम्ही कमी रन्स बनवून देखील विजयी झालो.

जसे आम्ही केकेआरचे दोन फलंदाज आऊट केले तिथून आम्हाला मोमेंटम मिळाला. यानंतर जेव्हा चहलने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली तेव्हा आमच्या आशा वाढल्या. तेव्हा आम्ही एका बाजूने केकेआरवर अटॅक करण्यासाठी प्लॅन केला. यानंतर त्यांचा चुकांचा फायदा आम्हाला मिळत गेला, असंही श्रेयस अय्यरने सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT