Karun Nair on Bumrah
Karun Nair on BumrahSaam tv

Karun Nair: मला सतर्क राहावं...; बुमराहसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर नायरचं मोठं विधान, सामन्यानंतर दोघांचा Video व्हायरल

Karun Nair on Bumrah: रविवारी झालेल्या दिल्ली विरूद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात करूण नायर आणि बुमराह यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. दरम्यान यानंतर दोन्ही खेळाडूंनी सामन्यानंतर एकमेकांना मिठी मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Published on

आयपीएलमध्ये रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यामध्ये मुंबईचा १२ रन्सने विजय झाला. या सामन्यादरम्यान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिल्लीचा करूण नायर यांच्यामध्ये काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं. यावेळी सामन्यातनंतर करूण नायरने बुमराहबाबत मोठं विधान केलंय. याशिवाय सामन्यानंतर या दोघांचा मिठी मारतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

या सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने दिल्लीसमोर २०६ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना करूण नायरने ४० बॉल्समध्ये ८९ रन्सची तुफान खेळी केली. करूण फलंदाजी करत असताना सहाव्या ओव्हरमध्ये रन घेण्याच्या नादात तो बुमराहला आपटला. यानंतर नायरने बुमराहची माफीही मागितली.

Karun Nair on Bumrah
Rohit Sharma: रोहित शर्मा द मास्टर माइंड...! डगआऊटमध्ये बसून हिटमॅनने फिरवला सामना; पाहा कशी हिरावली दिल्लीकडून मॅच?

टाईमआऊटमध्ये दोन्ही खेळाडू भिडले

ही घटना घडल्यानंतर टाईमआऊटमध्ये मात्र या दोन खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. टाईमआऊटमध्ये बुमराह नायरला काहीतरी सांगत होता. या घटनेनंतर नायर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला समजावून सांगत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Karun Nair on Bumrah
Hardik Pandya Bat: हार्दिक पंड्याने दिल्लीविरूद्ध चिटींग केली? अंपायरने अचानक का तपासली मुंबईच्या कर्णधाराची बॅट?

काय म्हणाला करूण नायर?

सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये नायर म्हणाला की, मी एका फ्लोमध्ये खेळत होतो आणि मला तो कायम ठेवायचा होता. त्यामुळे योग्य बॉल निवडून मला त्याच दिशेने खेळायचं होतं. बुमराह सध्या जगातील बेस्ट गोलंदाज आहे. त्यामुळे मला सतर्क राहावं लागत होतं की तो कोणत्या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. मात्र मी मला जिथे रन करायचे होते तिथे केले.

Karun Nair on Bumrah
DC vs MI: दोघांचं भांडण रोहितची मजा...! बुमराह-नायरच्या वादात हिटमॅनचा वेगळाच स्वॅग, भांडणाची मजा घेतानाचा Video व्हायरल

दोघांनी मारली एकमेकांनी मिठी

यावेळी दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडियावर सामन्यानंतरचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये करूण नायर आणि जसप्रीत बुमराह एकमेकांना मिठी मारतायत. याशिवाय बुमराह नायरला काहीतरी सांगताना देखील दिसतोय. या व्हिडीओमुळे दोघांमध्येही सगळ्या गोष्टी आलबेल असल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com