Hardik Pandya Bat: हार्दिक पंड्याने दिल्लीविरूद्ध चिटींग केली? अंपायरने अचानक का तपासली मुंबईच्या कर्णधाराची बॅट?

Umpire Checks Hardik Pandya Bat: दिल्ली विरूद्ध मुंबई यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या कर्णधारासोबत एक घटना घडली. यामध्ये हार्दिक पंड्या मैदानावर येताच अंपायरने त्याची बॅट तपासली.
Umpire Checks Hardik Pandya Bat
Umpire Checks Hardik Pandya Batsaam tv
Published On

रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात अखेरीस 12 रन्सने मुंबईने विजय मिळवला. मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्स फलंदाजी करत एक वेगळी घटना घडली. ही घटना म्हणजे अंपायरने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची बॅट चेक केली. मात्र असं का केलं हे तुम्हाला माहितीये का?

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या २९ व्या सामन्यात ही घटना पाहायला मिळाली. ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी मैदानात आला. त्या वेळी, फील्ड अंपायर त्याची बॅट तपासताना दिसले. महत्त्वाचं म्हणजे पांड्याच्या बॅटची रुंदी आणि लांबी स्पर्धेने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य होती. जर असं नसतं तर एका नवीन समस्येत सापडला असता.

Umpire Checks Hardik Pandya Bat
DC vs MI: दोघांचं भांडण रोहितची मजा...! बुमराह-नायरच्या वादात हिटमॅनचा वेगळाच स्वॅग, भांडणाची मजा घेतानाचा Video व्हायरल

बॅट चेक करतानाचा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं दिसून येतंय की, मैदानावर उपस्थित असलेले अंपायर एका यंत्राच्या मदतीने पंड्याच्या बॅटचा आकार मोजताना होते.

सॉल्ट-हेटमायरच्या बॅटची केली तपासणी

मुंबई विरूद्ध दिल्ली सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगला होता. यावेळी या सामन्यात देखील सामन्यात मैदानावरील पंच फिल सॉल्ट आणि शिमरॉन हेटमायर यांच्या बॅटची तपासणी केली होती.

Umpire Checks Hardik Pandya Bat
IPL 2025 MI Vs Delhi Capitals: 'आम्हाला वाटलं आम्ही जिंकलो, पण...; पराभव झाल्यानंतर कर्णधार 'बापू' फलंदाजांवर संतापले

काय सांगतो आयपीएलचा नियम?

आयपीएलच्या नियमांनुसार, या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूच्या बॅटची रुंदी ४.२५ इंच किंवा १०.८ सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. याशिवाया खोली २.६४ इंच / ६.७ सेमी आणि कडा १.५६ इंच / ४.० सेमी पर्यंत असली पाहिजे.

Umpire Checks Hardik Pandya Bat
DC vs MI: तीन 'रन आऊट' आणि सामना फिरला; मुंबईनं अपराजित दिल्लीला नमवलं, MIची पॉईट्स टेबलमध्ये मोठी झेप

अचानक होतेय बॅटची तपासणी

सध्या सुरु असलेला सिझन आपण पाहिला तर सर्व टीम जवळजवळ प्रत्येक सामन्यात २०० रन्सचा टप्पा गाठतायत. कदाचित म्हणूनच अंपायर्सना खात्री करायची असेल की फलंदाजांना बॅटच्या माध्यमातून कोणताही अयोग्य आणि बेकायदेशीर फायदा मिळत नाहीये. यासाठी गेल्या काही सामन्यांपासून बॅटची तपासणी होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com