Shreyas Iyer Angry Video x
Sports

Shreyas Iyer Video : चालता हो! श्रेयस अय्यरचा पारा चढला, सामन्यानंतर सहकाऱ्यालाच दिली शिवी, Video Viral

Shreyas Iyer Angry Video : मुंबई इंडियन्सला क्वालिफायर २ सामन्यात पराभूत करत पंजाब किंग्सने फायनलमध्ये एन्ट्री मारली. यादरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

IPL 2025 मधील दुसरा क्वालिफायर सामना काल (१ जून) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाबच्या संघाने आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला. पंजाबने ५ विकेट्सने मुंबईचा पराभव केला. पंजाबच्या विजयामागे कर्णधार श्रेयस अय्यरचे मोठे योगदान होते. त्याने ४१ चेंडूत ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

पंजाब किंग्स फायनलमध्ये गेल्यानंतर श्रेयस अय्यर रागात असल्याचे पाहायला मिळाले. कॅप्टन अय्यर शशांक सिंहवर भडकल्याचे पाहायला मिळाले. रागाच्या भरात अय्यरने शशांकला शिवी घातली. 'माझ्याकडे पाहू नकोस, चालता हो', असे तो शशांकला म्हणाला. त्याने शशांकला हस्तांदोलन केले नाही. पूर्णवेळ तो शशांकवर संतापल्याचे पाहायला मिळाले. स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाली. श्रेयस अय्यरच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

श्रेयस अय्यर शशांक सिंहवर का रागावला होता?

सतराव्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्ड गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा श्रेयस अय्यर आणि शशांक सिंह फलंदाजी करत होते. ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर शशांक सिंहने मिड ऑनला शॉट मारला. श्रेयस-शशांक दोघे रनसाठी धावले. हार्दिक पंड्याने चेंडू झेलत जोरदार थ्रो केला. शशांक नॉन-स्ट्रायकर एंडपर्यंत पोहचण्याच्या आधी चेंडू स्टंपवर आदळला. शशांक धावून क्रीजपर्यंत पोहचू शकला असता, त्याने चूक केली असे श्रेयस अय्यरचे मत होते. शशांकने फक्त २ धावा केल्या. क्वालिफायर २ सारख्या महत्त्वाच्या सामन्यात चुकीमुळे विकेट गमावल्याने श्रेयस शशांकवर रागावला होता.

क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात पंजाब किंग्सचा संघ वरचढ ठरला. पहिल्या इनिंगमध्ये मुंबई इंडियन्सने २०३ धावा केल्या. २०४ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबच्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने सामना मुंबईकडून हिसकावून नेला. सामन्यात 'श्रेयस अय्यर शो' पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT