ms dhoni saam tv
क्रीडा

MS Dhoni: एमएस धोनी WTC चा अंतिम सामना खेळणार? दिग्गज खेळाडूच्या विधानाने सगळेच बुचकळ्यात

Ankush Dhavre

Ravi Shastri Statement: आयपीएल २०२३ स्पर्धेत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. या हंगामात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ देखील जोरदार कामगिरी करतोय. अनेकांचे असे म्हणणे आहे की, एमएस धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असणार आहे.

स्वतः एमएस धोनीने देखील अनेकदा असे वक्तव्य केले आहेत, ज्यावरून असा अंदाज व्यक्त केला जातोय की, हाच हंगाम एमएस धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असणार आहे. दरम्यान त्याची विकेटकिपींग पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्रींनी मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील केली आहे. मात्र विकेट किपींग कोण करणार? हा प्रश्न अजूनही भारतीय संघाला सतावतोय.

रिषभ पंत हा गेल्या काही महीन्यांपासून भारतीय संघासाठी विकेटकीपर फलंदाजाची भुमिका पार पाडत होता. मात्र काही दिवसांपुर्वी त्याचा कार दुर्घटनेत अपघात झाला होता. त्यानंतर केएस भरतला विकेटकिपींग करण्याची संधी दिली गेली होती. (Ravi Shastri On Ms Dhoni)

मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकला नव्हता. केएल राहुल देखील विकेटकिपर फलंदाज म्हणून खेळू शकतो मात्र त्याचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. आता माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Latest sports updates)

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात जेव्हा रवी शास्त्रींना विचारलं गेलं की, अंतिम सामन्यात केएल राहुल आणि केएस भरतपैकी कोणाला विकेटकिपींग करण्याची संधी मिळेल. या विषयावर अँकर आणि रवी शास्त्री यांच्यात चर्चा सुरु होती. त्यावेळी अँकरने विचारले की, 'आपण एमएस धोनीला रिटायरमेंटमधून बाहेर येण्याची मागणी करू शकतो का? तो फिट दिसतोय आणि चांगली विकेटकिपिंग देखील करतोय.? ' यावर उत्तर देताना रवी शास्त्री म्हणाले की, 'हो, नक्कीच. त्याने युवा खेळाडूंना आयपीएल स्पर्धेतून दाखवून दिलं आहे की, विकेटकिपिंग कशी केली जाते. तो कधीच रेकॉर्ड्स करण्यासाठी खेळत नाही. ज्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमधून माघार घेण्याचं मन बनवलं होतं , त्यावेळी कोणीच त्याचा निर्णय बदलू शकलं नव्हतं.'

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, 'धोनी कधीच असं करू शकत नाही. त्याने एकदा निर्णय घेतला की त्याचा निर्णय कोणीच बदलू शकत नाही. ज्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमधून माघार घेतली, त्यावेळी १०० सामने खेळण्यापासून तो केवळ १० सामने दूर होता आणि चांगल्या फॉर्ममध्येही होता. मात्र त्याला गर्दी आवडत नाही. त्याला शांत राहायला आवडतं. त्याने अचानक निवृत्ती घेण्याच निर्णय घेतला आणि युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT