IPL Points Table: धोनीची CSK ठरणार चॅम्पियन? पाहा IPLच्या Interval नंतर कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती

Updated Points Table Of IPL 2023: पहिला टप्प्याच्या समाप्तीनंतर कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती? जाणून घ्या.
IPL 2023 Playoff Schedule
IPL 2023 Playoff ScheduleSaam TV

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. काही सामने एकतर्फी राहिले तर काही सामन्यांचा निकाल हा शेवटच्या चेंडूवर लागला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ३५ सामने खेळले गेले आहेत.

म्हणजे स्पर्धेचा पहिला टप्पा समाप्त झाला आहे. मंगळवारी पहिल्या टप्प्यातील शेवटचा सामना पार पडला. दुसऱ्या टप्प्यात ३५ सामने आणि प्लेऑफचे ४ सामने खेळले जाणार आहेत. दरम्यान पहिला टप्प्याच्या समाप्तीनंतर कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती? जाणून घ्या.

IPL 2023 Playoff Schedule
Rohit Sharma IPL 2023: रोहित शर्मा IPL 2023 मधून माघार घेणार?, माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला

आयपीएलच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. चेन्नईने ७ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर गतवर्षीच्या चॅम्पियन संघ गुजरात टायटन्स संघाने देखील इतकेच सामने जिंकले आहेत.

हा संघ १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दोघांचे गुण सारखे असले तरी चेन्नईचा रन रेट चांगला असल्याने चेन्नईचा संघ या यादीत सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. तर तिसऱ्या स्थानापासून ते सहाच्या स्थानापर्यंत असलेल्या संघांची गुणसंख्या प्रत्येकी ८-८ आहे. सर्व संघानी ७ सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्स संघ हा एकमेव संघ आहे ज्या संघाची गुणसंख्या ६ आहे. (Latest sports updates)

IPL 2023 Playoff Schedule
Mark Wood: LSG संघाला मोठा धक्का! संघातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज घेणार IPL 2023 स्पर्धेतून माघार, वाचा काय आहे कारण

तर कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाची धावसंख्या प्रत्येकी ४-४ आहे. चेन्नई आणि गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपर जायंट्स संघ चौथ्या स्थानी आहे.

पाचव्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सहाव्या स्थानी पंजाब किंग्ज संघ आहे. सातव्या स्थानी मुंबई इंडियन्स, आठव्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स, नवव्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद आणि सर्वात अंतिम स्थानी दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे.

मुंबईवर गुजरातचा दणदणीत विजय

मंगळवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने जोरदार कामगिरी करत ५५ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा गुजरात टायटन्स संघाला मोठा फायदा झाला आहे.

चौथ्या स्थानी असलेला गुजरातचा संघ आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबईचा संघ सातव्या स्थानी विराजमान आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com