shashank singh and shreyas iyer news Saam tv
Sports

Shashank Singh : मला कानाखाली मारायला हवी होती; श्रेयस अय्यरच्या शिवीगाळीवर शशांकचा मोठा खुलासा

shashank singh and shreyas iyer news : श्रेयस अय्यरच्या शिवीगाळीवर शशांक सिंहने मोठा खुलासा केलाय. मला कानाखाली मारायला हवी होती, अशी भावना त्याने व्यक्त केली.

Vishal Gangurde

IPL 2025: आयपीएलचा क्वालिफायर २ मध्ये सामना जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने स्टार खेळाडू शशांक सिंहला मैदानातच शिवीगाळ केली होती. अय्यरने शंशाकला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अय्यरच्या या वर्तवणुकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली होती. आता याच प्रकारावर शंशाक सिंहने मोठा खुलासा केला आहे.

आयपीएल संपल्यानंतर शंशाक सिंहने अय्यरबाबत मोठा खुलासा केलाय. या संपूर्ण प्रकारावर शंशाक सिंहच्या वडिलांनीही राग व्यक्त केला होता. मुंबई इंडियन्सच्या विरोधात क्वालिफायर २ मध्ये शशांक सिंह हा स्वत:च्या चुकीने रन आऊट झाला होता. यावरून कर्णधार श्रेयस अय्यरने शंशाकवर राग व्यक्त केला. अय्यरने शंशाकला शिवीगाळ केली होती.

एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना शंशाक सिंह म्हणाला, 'मला कानाखाली मारायला हवी होती. या प्रकरणामुळे वडील माझ्यासोबत अंतिम सामन्यांपर्यंत बोलले नाही. मी निवांत होतो. मी बागेत नव्हतो, तर समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत होतो, तो माझ्यासाठी महत्वाचा काळ होता'. सामन्यानंतर श्रेयसने स्पष्टपणे सांगितले की, 'मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण नंतर त्याने मला रात्रीच्या जेवणासाठी बाहेर नेलं'.

अंतिम सामन्यात शंशाकची झुंजार खेळी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि पंजाब किंग्सदरम्यान आयपीएल सीझनचा अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबी टीमने २० षटकात १९० धावा केल्या होत्या. पंजाब किंग्सच्या टीमने केवळ १८४ धावा कुटल्या. पंजाब किंग्सचा संघ अवघ्या ६ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात शशांक सिंह शेवटच्या षटकापर्यंत आक्रमकरित्या खेळत होता. शंशाकने ३० चेंडूत ६१ धावा केल्या होत्या. शंशाकच्या स्फोटक फलंदाजीनंतर संघाला जिंकवू शकला नाही. या डावात शंशाकने ६ षटकार लगावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

Maharashtra Live News Update: रत्नागिरीच्या लोटे midc मध्ये विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT