Shaqkere Parris Twitter
क्रीडा

CPL 2024: 21 वर्षीय फलंदाजाने खेचला 124 मीटर लांब षटकार; बॅटला लागताच चेंडू थेट स्टेडियम बाहेर-VIDEO

Ankush Dhavre

Shaqkere Parris Hits 124m Six in CPL: वेस्टइंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील १९ व्या सामन्यात एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचा फलंदाज शकेरे पॅरिसने १२४ मीटर लांब षटकार खेचला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

शकेरे पॅरिस या २१ वर्षीय फलंदाजाने शानदार फलंदाजी करत १२४ मीटर लांब षटकार खेचला आहे. या षटकार त्याने गुडकेश मोटीच्या गोलंदाजीवर खेचला आहे. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स आणि ट्रिनबागो टबॅगो यांच्यातील सामन्यात गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यातील सामन्यात डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज गोलंदाजीला आला. त्यावेळी त्याने शकेरेने मिड विकेटच्या दिशेने षटकार खेचला. हा षटकार बॅटला लागताच थेट मैदानाबाहेर गेला. हा CPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार ठरला आहे. दरम्यान आतापर्यंतचा सर्वात लांब षटकाराचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा अजूनही दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अॅल्बी मॉर्केलच्या नावावर आहे. मॉर्केलने आयपीएल २००८ स्पर्धेत १२५ मीटर लांब षटकार खेचला होता. आता पॅरिसने १२४ मीटर लांब षटकार खेचला आहे. त्यामुळे सर्वात लांब षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा १ मीटरने हुकला आहे. यासह ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने १२२ मीटर लांब षटकार खेचला होता.

या ऐतिहासिक षटकारासह पॅरिसने आपल्या संघाच्या विजयाच अतिशय महत्वाची भूमिका बजावली. ट्रिनबागो नाईट राडयर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४९ धावांचं आव्हान होतं. या धाावांचा पाठलाग करताना पॅरिसने शानदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या विजयात २९ धावांचे योगदान दिले. त्याला आंद्रे रसेलने ३६ आणि टीम डेव्हिडने ३१ धावांचं योगदान दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

SCROLL FOR NEXT