IND vs BAN Latest Updates in Marathi: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी आर अश्विन आणि रविंद्र जडेजाच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने धावांचा डोंगर उभारला आहे. पहिल्या दिवशी भारताने ३३९ धावा केल्या आहेत. भारतीय संघ मजबूत स्थितीत असला तरीही ३ कारणांमुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बांगलादेशच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. सुरुवातीच्या एका तासात हसन महमूदने भारताच्या ३ प्रमुख फलंदाजांना माघारी धाडलं.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र या सामन्यात त्याने खूपच संथ सुरुवात केली. नेहमी निर्भिड होऊन फलंदाजी करणारा रोहित या सामन्यात सावध राहून फलंदाजी करताना दिसला. रोहितने आपल्या स्वभावाप्रमाणे नैसर्गिक खेळ केला असता, तर कदाचित भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली असती. ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा बऱ्याच महिन्यांनी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उतरला आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात त्याची कमजोर बाजू समोर आली आहे. विराट हा कव्हर ड्राईव्ह खेळण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र हाच शॉट खेळताना तो अनेकदा बाद होऊन माघारी परतला आहे. बांगलादेशचा युवा गोलंदाज हसन महमूदनेही त्याला हाच चेंडू टाकून आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यामुळे पुन्हा एकदा विराटची ऑफ साईडची कमकुवत बाजू समोर आली आहे.
शुभमन गिलला भारतीय क्रिकेटचं भविष्य मानलं जातं. मात्र पहिल्याच कसोटीत त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात जेव्हा संघाला त्याची जास्त गरज होतों त्यावेळी तो नको त्या चेंडूवर विकेट टाकून माघारी परतला. यापूर्वी पुजारा या क्रमांकावर फलंदाजी करायचा. तो संयम ठेवून फलंदाजी करायचा. मात्र गिलच्या फलंदाजीत कुठेही संयम दिसून आला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.