IND vs BAN 1st Test: जडेजा अन् अश्विनच्या जोडीने रचला इतिहास! मोडून काढला 15 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड

R Ashwin- Ravindra Jadeja Record:आर अश्विन आणि रविंद्र जडेज या जोडीने रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. यासह एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
IND vs BAN 1st Test: जडेजा अन् अश्विनच्या जोडीने रचला इतिहास! मोडून काढला 15 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड
r ashwin ravindra jadejatwitter
Published On

Ravindra Jadeja- R Ashwin Creates History: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अवघ्या ३४ धावांवर भारताचे ३ प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते.

पुढे जाऊन संघाचा डाव पुन्हा गडगडला. १४४ धावांवर ६ गडी फलंदाज बाद झाले. त्यानंतर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दरम्यान जडेजा अन् अश्विनच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

आर अश्विन हा जगातील एकमेव अष्टपैलू खेळाडू ठरलाय, ज्याने कसोटीत ५०० पेक्षा अधिक गडी बादे केले आहेत. यासह फलंदाजी करताना २० वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अश्विन या यादीत अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचा माजी खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ब्रॉडने गोलंदाजी करताना ६०४ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना त्याने १४ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती.

IND vs BAN 1st Test: जडेजा अन् अश्विनच्या जोडीने रचला इतिहास! मोडून काढला 15 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड
IND vs BAN, 1st Test: हसन महमूद अन् रविंद्र जडेजा यांच्यात जोरदार धडक! पाहा VIDEO

कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक

या सामन्यात भारतीय संघातील टॉप ऑर्डरचे फलंदाज फ्लॉप ठरले. त्यानंतर भारतीय संघाचा डाव गडगडला होता. मात्र अश्विनने जडेजासोबत मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. ज्यावेळी १४४ धावांवर भारताचे ६ फलंदाज माघारी परतले होते. त्यावेळी या जोडीने मिळून संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी केली.

आर अश्विन अन् जडेजाच्या जोडीने रचला इतिहास

पहिल्या दिवसाखेर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने १९५ धावांची भागीदारी केली आहे. अश्विन १०२ तर जडेजा ८६ धावांवर नाबाद आहे. ही कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर खेळताना केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी २००९ मध्ये जेसी रायडर आणि डॅनियल विटोरीने भारतीय संघाविरुद्ध खेळताना १८६ धावांची भागीदारी केली होती. आता अश्विन आणि जडेजाच्या जोडीने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

IND vs BAN 1st Test: जडेजा अन् अश्विनच्या जोडीने रचला इतिहास! मोडून काढला 15 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड
IND vs BAN, 1st Test: विराट-रोहित ६-६, गिल ०, तासभरातच टॉप ऑर्डर कोसळली, बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज पडला भारी

शतक पूर्ण करताच अश्विनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो सात किंवा सात पेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या यादीत एमएस धोनी आणि कपिल देवसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या दिग्गज खेळाडूंनी ४ शतकं झळकावली आहेत. आता आर अश्विनने देखील या यादीत प्रवेश केला आहे.

कसोटी कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक

बांगलादेशविरुद्ध झळकावलेलं हे शतक अश्विनने अवघ्या १०८ चेंडूत पूर्ण केलं आहे. हे अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. यापूर्वी त्याने वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या कसोटीत ११७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com