sfa championship saam tv
Sports

SFA Championship: तिसऱ्या दिवशी ॲथलेटिक्स, स्पीडकबिंग, कराटेचा थरार; मायरा दोधिया,वेध नायर, वेद पुजारीने पटकावलं गोल्ड

SFA Championship News In Marathi: SFA चॅम्पियनशिप स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी अॅथलेटीक्ससह कराटे आणि स्पीडबकींगचा थरार पाहायला मिळाला.

Ankush Dhavre

SFA चॅम्पियनशिप स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी अॅथलेटीक्ससह कराटे आणि स्पीडबकींगचा थरार पाहायला मिळाला.या स्पर्धेतील ८ वर्षांखालील स्पीडबकींग क्रीडा प्रकारात नेक्स्ट स्कूलच्या मायरा दोधियाने 1:24:06 वेळ नोंदवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर ठाण्यातील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या तश्वी शेट्टीने 1:48.71 वेळ नोंदवर रौप्य पटकावलं.

यावर्षी SFA चॅम्पियनशिप स्पर्धेत ३ ते १८ वयोगटातील एकूण ७९० शाळांमधील २१,००० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा १२ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

विरार पश्चिमच्या जॉन XXIII CBSE शाळेच्या वेध नायरने मुलांच्या 7 वर्षांखालील कराटेमध्ये सुवर्णपदक पटकावलं. तर कांदीवलीतील गुंदेचा एज्युकेशन अकॅडमीच्या प्रशम संचेतीने रौप्य पदकाची कमाई केली.

तर अॅथलेटिक्समध्ये मालाडच्या चिल्ड्रन्स अॅकेडमीच्या वेद पुजारीने ५.२४ मीटर लांब उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

तर ठाण्यातील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल शाळेतील सौरीश राऊतने १४ वर्षांखालील मुलांच्या लांब उडी प्रकारात ४.९० मीटर लांब उडी मारत रौप्यपदकावर नाव कोरलं.

तर कांदिवली येथील गुंदेचा एज्युकेशन अकादमीच्या प्रशम संचेतीने रौप्यपदक जिंकले. ॲथलेटिक्समध्ये, मालाडच्या चिल्ड्रन्स अकादमीच्या वेद पुजारी आणि रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, ठाणे येथील सौरिश राऊत यांनी अनुक्रमे 5.23 मीटर आणि 4.90 मीटर अशा मुलांच्या 14 वर्षांखालील लांब उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले.

वसंत विहार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या रुद्रांश राणेने सुवर्ण, तर कांदिवलीच्या चत्रभुज नरसी शाळेतील मितांश लढा याने अनुक्रमे १५.९५९ आणि १७.४३२ अशा वेळेसह रौप्यपदक मिळवले.

या स्पर्धेतील ३ दिवसांनंतर डॉन बॉस्को हायस्कूल ही शाळा पदकांच्या यादीत आघाडीवर आहे. या शाळेने 3 सुवर्ण, आणि 1 कांस्य पदकासह ५० गुणांची कमाई केली आहे. तर स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, चेंबूर, 40 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघात थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT