tarabai yede playing kabbadi, gondia news saam tv
Sports

Viral Video : याला म्हणतात जिद्द, आत्मविश्वास! कबड्डी खेळतानाचा आजीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गाेंदिया जिल्ह्यात महिलांसाठी विविध कार्यक्रम झाले.

अभिजीत घोरमारे

Kabbadi News : जीवनाचा आनंद घ्यायचा म्हटलं की त्याच्या आड काळ, वेळ, वय काहीही येऊ शकत नाही हे गोदिंया जिल्ह्यातील दुर्गम असलेला सालेकसा तालुक्यातील नानव्हा गावातील 78 वर्षाच्या ताराबाई येडे (tarabai rede) यांनी दाखवून दिले आहे. स्त्री मुक्ती दिना ( निमित्त नानव्हा गावात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयाेजिले हाेते. त्यामध्ये कबड्डी स्पर्धेचा समावेश हाेता. महिलांच्या संघात 78 वर्षीय ताराबाई येडे या सहभागी झाल्या हाेत्या. (Gondia Latest Marathi News)

त्यांचे वय आणि अंगकाठी पाहता त्या सर्वांच्या काैतुकाच्या विषय ठरल्या. साडीचा कासाेटा घालून त्या कसलेल्या कबड्डीपटू सारख्या प्रतिस्पर्धी संघातील गड्यांना बाद करण्यासाठी आपले कसप पणाला लावत हाेत्या. कबड्डीच्या या सामन्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून (Social Media) व्हायरल (viral) हाेत आहे.

ताराबाई यांनी हाैसेला माेल नसते हे त्यांच्या स्पर्धेतील सहभागातून अन्य महिलांना दाखवून दिले आहे. आयुष्यात अनेक सुखदुःखच्या अनुभवाची शिदोरी असलेल्या ताराबाईंच्या चेहऱ्यावर कबड्डी खेळतानाचा आनंद दिसत हाेता. त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास मैदानावरील खेळाडूंना प्रेरणादायी ठरली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT