sarfaraz khan twitter
Sports

Sarfaraz Khan ने इतिहास रचला! ६५ वर्षांत जे सचिन, रोहित अन् गावसकरांना नाही जमलं, ते करून दाखवलं

Sarfaraz Khan Record In Irani Cup 2024: भारतीय संघातील युवा फलंदाज सरफराज खानने इराणी कप स्पर्धेत मोठा रेकॉर्ड करुन दाखवला आहे.

Ankush Dhavre

Sarfaraz Khan Double Century: भारताचा स्टार युवा फलंदाज सरफराज खानला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. आता इराणी कपमध्ये मुंबई संघाकडून खेळताना त्याने दुहेरी शतकी खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाची धावसंख्या ५०० धावांच्या पार पोहोचवली. दरम्यान या खेळीसह त्याने ६५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

इराणी कपचा सामना मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. सरफराज खान हा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाकडून खेळतोय. दरम्यान इराणी कप स्पर्धेतील ६५ वर्षांच्या वर्षातील सरफराज खान मुंबईकडून दुहेरी शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

मुंबईकडून रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकरांसारखे दिग्गज मैदान उतरले. मात्र त्यांना मुंबईसाठी दुहेरी शतक झळकावता आलं नाही. सरफराज खानच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर, २६ चौकार आणि ४ षटकारांसह तो २२१ धावांवर नाबाद राहिला.

सध्या मुंबई संघाचं नेतृत्व करत असलेल्या अजिंक्य रहाणेने २०१० मध्ये १९१ धावांची खेळी केली होती. तर रामनाथ पारकर यांनी १९७२ मध्ये नाबाद १९४ धावा केल्या होत्या. सरफराज खान हा इराणी कपमध्ये दुहेरी शतक झळकावणारा ११ वा फलंदाज ठरला आहे. दरम्यान या स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा वसिम जाफर यांच्या नावावर आहे. त्यांनी २८६ धावांची खेळी केली होती.

या खेळाडूची जागा धोक्यात?

नुकताच भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेसाठी सरफराज खानला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. मात्र त्याला प्लेइंग ११ संधी मिळाली नाही. त्याच्याऐवजी केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आला. आता सरफराज खानच्या शतकी खेळीमुळे केएल राहुलवर असलेला दबाव देखील वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT