Sania Mirza At Grand Slam Final
Sania Mirza At Grand Slam Final Instagram @mirzasaniar
क्रीडा | IPL

Sania Mirza Viral Video: टेनिस कोर्टवर पराभवानंतर सानियाला अश्रू अनावर; पाणावलेल्या डोळ्यांना ग्रँड स्लॅम स्पर्धेला निरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sania Mirza Gets Emotinal At Grand Slam Final: भारतची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा पार्टनर हमवतन रोहन बोपन्ना यांना ऑस्ट्रेलिया येथील मिक्स डबलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे सानियाचे ग्रँड स्लॅम जिंकून करिअरमधून निवृत्त होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. सानियाने तिच्या करिअरमध्ये सहा ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत.

ग्रँड स्लॅमचा फायनल सामना मेलबर्न येथील रॉड लेवर एरेना येथे खेळण्यात आला. सानिया आणि बोपन्ना यांच्या जोडीला लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस या ब्राजीलियन जोडीने ६-७ (२) २-६ पराभूत केले आहे. पराभवानंतर ३६ वर्षीय सानियाला अश्रू अनावर झाले. सानियाने घोषणा केली आहे की, फेब्रुवारीमध्ये दुबईत होणाऱ्या डब्ल्यूटीए टूर्नामेंट तिच्या करिअरमधील शेवटची टूर्नामेंट असेल.

४२ वर्षीय रोहन बोपन्नाने सानियाला तिच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तासवच त्याने सांगितले की, सानिया देशातील अनेक युवकांना प्रेरित केले आहे. बोपन्नाने सानियाचे कौतुक केल्यानंतर ती खूप भावुक झाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागले.

सानिया मिर्झाने स्वतःला सावरत माईक हातात घेतला आणि सर्वांचे आभार मानेल. तसेच विजेत्या जोडीचे अभिनंदन केले. त्यानंतर सानिया म्हणाली, 'माझ्या प्रोफेशन करिअरची सुरुवात मेलबर्नमधून २००५ साली झाली. ग्रँड स्लॅमचा निरोप घेण्याची यापेक्षा उत्तम जागा असूच शकत नाही.' डोळ्यापणी आल्याने तिने सर्वांची माफी मागितली.

स्वतःला सावरल्यानंतर सानियाने पुढे बोलणाया सुरुवात केली. 'येथे जेव्हा मी सेरेना विलियमच्या विरोधात खेळले तेव्हा १८ वर्षीची होते. १८ वर्षांपूर्वी कॅरोलिना विरोधात खेळले होते. मेलबर्न नेहमीच मला घरच्यासारखी वागणूक मिळाली. या गोष्टीचा मला नेहमीच गर्व असेल.' सानिया मिर्झाचा हा भावुक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सानियाने मिक्स डबलमध्ये ३ वेळा ग्रँड स्लॅम किताब जिंकला आहे. सानियाने सहा वेळा ग्रँड स्लॅम 'किताब जिंकला आहे. महेश भूपती (२००९ ऑस्ट्रेलिया ओपन, २०१२ फ्रेंच ओपन) आणि ब्राजिलच्या ब्रुनो सोरेस (२०१४ अमेरिका ओपन) असे तीन मिक्स डबल सानियाने जिंकले आहेत. सानियाने ओमानस डबल ग्रँड स्लॅम किताब हिंगिस (विम्बल्डन २०१५, अमेरिका ओपन २०१५ आणि ऑस्ट्रेलिया ओपन २०१६)यांच्यासह जिंकले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : पाकिस्तानने रचलेलं मोठं षडयंत्र त्यांनी कोर्टासमोर आणलं; उज्वल निकम यांचं नाव घेत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Vishal Patil: अल्टिमेटम संपला तरी विशाल पाटील ठाम! काँग्रेस करणार कारवाई?

Special Report | Raigad Lok Sabha : रायगडमध्ये ठाकरे आणि अजित पवार गटात लढत

Chandrashekhar Bawankule Meets Chhagan Bhujbal : बावनकुळे, भुजबळांमध्ये भेट! कारण काय?

FACT CHECK: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल! कोल्हापूरमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य नेमकं काय?

SCROLL FOR NEXT