Bigg Boss 16: फराह खानने घेतली प्रियांका आणि टीनाची शाळा, तर शालिनला म्हणाली 'कानाखाली मारून तुला...'
Bigg Boss 16 Update: 'बिग बॉस 16' आता अंतिम टप्प्यात आला आहे. या शोला देखील लवकरच त्याचा विजेता मिळणार आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये जोरदार मारामारी पाहायला मिळाली आहे. तर या आठवड्यात फराह खान वीकेंड का वारमध्ये सलमान खानच्या जागी शो होस्ट करताना दिसणार आहे. प्रियांका चहर चौधरी आणि टीना दत्ता यांनी शालीन भानोतची खिल्ली उडवली. यावरून फराह दोघींनाही खडसावणार आहे.
निर्मात्यांनी शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये फराह खान स्पर्धकांशी बोलताना दिसत आहे. यानंतर फराह, प्रियांका आणि टीनाला शालीनची चेष्टा केल्याबद्दल त्यांची शाळा घेताना दिसत आहे. फराह बोलत असताना टीना मधेच बोलत असते. फराहचे बोलणे पूर्ण होण्याआधी टीनाने आणलेला व्यत्यय दिग्दर्शक फराहला आवडत नाही. टीनाचे वागणे पाहून फराह शो मध्येच सोडून जाताना दिसत आहे.
फराह खान म्हणते, 'तुम्ही सर्वांनी टीनाकडून शिकले पाहिजे. एखाद्याला तुमच्या फायद्यासाठी वापरा आणि मग टिश्यू पेपर बनवा आणि फेकून द्या. त्याचा दात तुटला आहे जे खूप गंभीर आहे. यामुळे त्याला घर देखील सोडावे लागले. शालीनला हे एका वाईट स्वप्नासारखे आहे आणि तुम्ही लोक त्याची खिल्ली उडवत आहेत. शालीन तू काय करतोयस? मला कानाखाली मारून तुला उठवायचं आहे.'
यानंतर फराह प्रियांककडे वळते आणि तिला म्हणते की, प्रियंका तू नेहमी सत्य सत्य म्हणत असतेस, तुझा सत्याचा फुगा आता फुटला आहे. यानंतर टीना मध्येच अॅटीट्युड दाखवू लागते, ज्यामुळे फराह खान चिडते आणि टीनाला म्हणते, 'तू तुझा अॅटीट्युड तुझ्याकडे ठेव. त्यामुळे लोकांच्या त्रास होत आहे. तू आता ऐकतोस की मी जाऊ?' यानंतर फराह तिथून निघून जाते.
'शुक्रवार का वार'मध्ये खूप गंमती-जंमती देखील पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये फराहसोबत कार्तिक आर्यन आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत. प्रियांका आणि अर्चना यांना कार्तिक आर्यनसोबत रोमँटिक सीन करण्याची संधी मिळणार आहे, तर एमसी स्टॅन अनिल कपूरला त्यांची भाषा शिकवणार आहेत. यामुळे 'शुक्रवार का वार' खपाचा धमाकेदार होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.