Saina Nehwal - Parupalli Kashyap Announce Divorce Saam Tv
Sports

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Saina Nehwal - Parupalli Kashyap Announce Divorce: बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप विभक्त झाले. सायना नेहवालने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. तिच्या आणि पारूपल्लीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Priya More

भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. सायना नेहवाल आणि तिचा पती बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप विभक्त होणार आहे. सायना आणि पारूपल्ली घटस्फोट घेत आहेत. सायनाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती शेअर केली. सायनाच्या या पोस्टनंतर देशभरातील बॅडमिंटन चाहत्यांना मोठा धक्का बसला.

७ वर्षांच्या सुखी संसारानंतर सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या ७ वर्षांनंतर दोघे विभक्त होत आहेत. बराच विचार केल्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सायना नेहवालने आपल्या पोस्टमध्येच दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

सायना नेहवालने १३ जुलै रोजी रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करून घटस्फोट घेत असल्याचे सांगितले. सायनाच्या या पोस्टनंतर ती आणि तिचा नवऱ्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. सायनाने या पोस्टमध्ये लिहिले की, 'आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या वळणावर घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर पारूपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि शांततापूर्ण जीवन जगणं निवडत आहोत.'

सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण अद्याप समोर आले नाही. पण सायनाने कश्यपसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आनंद व्यक्त केला. सायनाने पुढे असे लिहिले की, 'या आठवणींसाठी मी नेहमीच पारूपल्लीची कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देते. अशावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.'

सायना आणि कश्यप यांचे ७ वर्षांपासून लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून लपवून ठेवले होते. दोघांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकॅडमिमध्ये झाली होती. जिथे हे दोघे प्रशिक्षण घेत होते. इथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्याचे सांगितले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पगार १८ हजारांवरून थेट ४४,२८० रुपये होणार, सरकारचा मोठा निर्णय

Kalyan : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटात इनकमिंग सुरु; काँग्रेसच्या २ शिलेदारांचा शिवसेना प्रवेश

Maharashtra Live News Update: समाजवादी पार्टीचे भीक मागो आंदोलन

Navi Mumbai News : 'साम'चा रिअ‍ॅलिटी चेक! नवी मुंबईतील मतदार यादीत घोळ

'या' देशांमध्ये भारतीय डिग्रीला मान्यता नाही

SCROLL FOR NEXT