Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अन् सायना नेहवाल यांच्यात रंगला बॅडमिंटनचा सामना! पाहा VIDEO

Droupadi Murmu Played Badminton With Saina Nehwal: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला आहे.
Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  अन् सायना नेहवाल यांच्यात रंगला बॅडमिंटनचा सामना! पाहा VIDEO
droupadi murmutwitter

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला आहे. द्रौपदी मुर्मू यांनी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला आहे. द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल या दोघांमध्ये राष्ट्रपती भवन इथल्या बॅडमिंटन कोर्टवर रोमांचक सामना रंगला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बॅडमिंटन खेळत असल्याचा व्हिडिओ हा राष्ट्रपती भवनाकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये द्रौपदी मुर्मू आपल्या बॅडमिंटन स्किल्स दाखवताना दिसून येत आहेत. दोघांचा सामना पाहण्यासाठी युवा खेळाडूंनी आणि कार्यालयीन अधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा २३ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  अन् सायना नेहवाल यांच्यात रंगला बॅडमिंटनचा सामना! पाहा VIDEO
IND vs ZIM,3rd T20I: इथंच सामना फिरला.. शुभमन गिलने सांगितला भारत- झिम्बाब्वे सामन्यातील टर्निंग पॉईंट

द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या स्किल्सने सायना नेहवाललाही आश्चर्यचकीत केलं. द्रौपदी मुर्मू यांनी केलेली सर्व्हिस खेळताना सायना नेहवाललाही कष्ट घ्यावे लागत आहे. द्रौपदी मुर्मू यांचे अप्रतिम स्किल्स पाहून प्रेक्षक त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करताना दिसून येत आहे. देशासाठी कर्तव्य बजावत असताना द्रौपदी मुर्मू यांनी वेळ काढून दिग्गज बॅडमिंटनपटूसोबत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. हे पाहून त्यांच्या खिलाडूवृत्तीचंही दर्शन घडत आहे.

Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  अन् सायना नेहवाल यांच्यात रंगला बॅडमिंटनचा सामना! पाहा VIDEO
IND vs ZIM 3rd T20I: गिल-वॉशिंग्टनने मिळवून दिला 'सुंदर' विजय; हरारेमध्ये झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com