एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांचा विजय निश्चित; आशिष शेलार यांचा विश्वास

पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल.
ashish shelar
ashish shelarSaam Tv
Published On

मुंबई - भारताचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी ४,००० हून अधिक सदस्य आज मतदान करणार आहेत. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना अनेक प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिल्याने, संख्या स्पष्टपणे एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने आहे. यंदा एनडीएकडून द्रौपदी मूर्म आणिा युपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या निवडणुकीत महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना विक्रमी मते मिळणार, तसेच द्रोपदी मुर्मु यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केला. द्रोपदी मुर्मु यांना रेकॉर्ड ब्रेक समर्थन मिळेल असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले आहे.

हे देखील पाहा -

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडीचं अस्तित्व मला दिसत नाही. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकिय इतिहास ठरेल. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते आपण पाहिलं आहे. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल. सकाळी उठून माध्यमांना प्रतिक्रिया द्यायची आणि दुपारी कोर्टात जायचं .एवढंच काम आता शिवसेनेच्या नेत्यांकडे राहिलं आहे अशी टीका देखील आशिष शेलार यांनी येवेळी केली आहे.

ashish shelar
Corona Update: आता बाधितांच्या कुटुंबीयांच्याच तपासण्या; कोरोना चाचण्या झाल्या कमी

राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. त्यामुळं त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. निकाल 21 जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com