जळगाव : शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घट होत आहे. आता बाधितांच्या समवेत वीस जणांची कोरोना चाचणी करणे बंद झाले असून केवळ बाधित व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचीच कोरोना (Corona) चाचणी होत आहे. दररोज दहा ते शंभर बाधितांसह संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. रुग्णालयात (Hospital) दाखल होण्यासारखी गंभीर रुग्ण कोरोनाचे नसल्याने त्यांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. (Jalgaon Corona Update News)
कोरोना महामारीच्या आतापर्यंत तीन लाटा (Jalgaon News) येऊन गेल्या आहेत. तरीही महामारी अजून पाठ सोडायला तयार नाही. चौथी लाट जूनमध्ये येणार असे संकेत आरोग्य विभागाने दिले होते. मात्र, तशी लाट आलेली नाही. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccination) घेतल्याने तिसरी लाट आली तरी रुग्णांना थेट रुग्णालयात दाखल करून ऑक्सिजनवर ठेवण्याची गरज पडली नाही. प्रतिबंधक लस घेतल्याने रुग्ण संख्या वाढलेली नाही. नागरिकांनी मास्क वापरावा, गर्दीत जाणे टाळावे, वारंवार हात धुवावेत असा सल्ला आरोग्य विभागाचे अधिकारी देताना दिसतात.
कोरोनाबाधितांचा तपशील
रविवारचे बाधित रुग्ण --१३
जळगाव शहरात आढळलेले--६
होम आयसोलेशनमध्ये असलेले--६३
रविवारी बरे झालेले रुग्ण--७
आतापर्यंतचे एकूण बाधित--१५१८६६
आतापर्यंत एकूण बरे झालेले--१४९२०४
एकूण मृत्यू--२५९२
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.