sachin tendulkar birthday special when sachin tendulkar had to wear diaper while batting amd2000 twitter
Sports

Sachin Tendulkar Birthday Special: ...जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर डायपर लावून उतरला मैदानात; भन्नाट किस्सा

Sachin Tendulkar Batting: आज सचिन तेंडुलकर आपला ५१ वा वाढदिवस साजरा करतोय. दरम्यान या खास दिवशी जाणून घ्या, त्याच्या आयुष्यातील एक खास किस्सा

Ankush Dhavre

क्रिकेट फॅन्ससाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण दिवशी तेंडुलकर कुटंबात एक गुणवान बाळ जन्माला आलं ज्याने पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. १०० शतकं, सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार ही यादी न संपणारी आहे. आपण कोणाबद्दल बोलतोय याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर आम्ही बोलतोय भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल. सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक मॅचविनिंग खेळ्या केल्या. दरम्यान २४ वर्षांच्या कारकिर्दीत एक खेळी होती, जी क्रिकेट फॅन्स क्वचितच विसरु शकतील.

हा किस्सा आहे २००३ वर्ल्डकप स्पर्धेतील. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू होता या सामन्यापूर्वी सचिन डिहायड्रेशनशी झुंज देत होता. अशा परिस्थितीत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्याने पाणी आणि एनर्जी ड्रिंक्ससोबत मीठ घेण्यास सुरुवात केली. या कारणामुळे त्याचे पोट खराब झाले होते.

पोट दुखत असताना इतर कुठलाही फलंदाज असता तर त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला असता. मात्र मैदान सोडेल तो मास्टर ब्लास्टर कसला. पोटात बिघाड झाला असूनही सचिनने मैदानावर जाऊन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी तो अंडवेयरमध्ये डायपर लावून मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ९७ धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र त्याचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं होतं.

का झाला होता त्रास?

सचिनने आपली बायोग्राफीमध्ये हा किस्सा सांगितला होता. ज्यात त्याने सांगितले आहे की, 'त्यावेळी मला डिहायड्रेशनचा त्रास जाणवत होता. त्यामुळे मी पाण्यात एक चमचा मिठ घालून ते पाणी पित होतो. मला वाटले होते की, याने प्रकृतीत सुधारणा होईल. मात्र उलटेच झाले होत.'

भारतीय संघाचा शानदार विजय...

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सचिन तेंडुलकरने ९७, वीरेंद्र सेहवागने ६६ आणि सौरव गांगुलीने ४८ धावांची खेळी केली होती.

या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ६ गडी बाद २९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून एकट्या कुमार संगकाराने ३० धावांची खेळी केली होती. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. या सामन्यात भारतीय संघाने १८३ धावांनी विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT