Maharashtra News Live Update: - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे यांचं उपोषण, राज्यात गणरायाच्या आगमनाची तयारी अन् पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर

- उद्या सकाळी मुख्यमंत्री नागपूर वरुन थेट दिल्ली जाणार

- काही महत्त्वाच्या कामासाठी मुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती

- दिल्ली भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट होण्याची शक्यता

मनमाड रेल्वे स्थानक परिसरात संध्याकाळच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने घातला धुमाकूळ

मनमाड रेल्वे स्थानक परिसरात संध्याकाळच्या सुमारास घातला धुमाकूळ,अज्ञात माथेफिरूने इसमाने रेल्वे स्थानकाच्या बुकिंग ऑफिस तसेच येत असलेल्या प्रवाशांवर दगड फेकून मारले,दोन्ही हातात दगड घेऊन हा माथेफिरू रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होता.आणि दगड फेकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे,विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग पोलीस,आरपीएफ ड्युटीवर सदैव तैनात असताना माथेफिरू दगड फेकतोय हे मात्र कोणाला समजले कसे नाही,एखाद्या प्रवाशाला इजा झाली असती तर असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे..

गुजरातमधून नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या आणलेली २१५५ किलो स्पेशल स्वीट बर्फी जप्त

नाशिक -

- गुजरातमधून नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या आणलेली २१५५ किलो स्पेशल स्वीट बर्फी जप्त

- नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

- गुजरातमधून नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असलेली स्पेशल स्वीट बर्फी जप्त

- २१५५ किलो बर्फीचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून ताब्यात

- जप्त केलेल्या बर्फीची किंमत तब्बल ५ लाख ५८ हजार २६७ रुपये

- दोन खासगी ट्रॅव्हल्स बसमधून बर्फीची वाहतूक केली जात होती

- द्वारका, नाशिक येथे पहाटेच्या सुमारास पथकाने केली कारवाई

- अन्नपदार्थाची वाहतूक करताना अस्वच्छ वातावरण आणि विनापरवाना वाहतूक केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास

- तसेच बर्फीची वाहतूक करताना आवश्यक तापमानाची अट पूर्ण करण्यात आलेली नसल्याने साठा जप्त

- अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ मधील तरतुदींनुसार कारवाई

- जप्त केलेला बर्फीचा साठा नष्ट करण्यात आला

उरणमध्ये कुटुंबावर जीवघेणा हल्ला

नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत उरण येथील द्रोणागिरी परिसरात एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी समोर आली. द्रोणागिरी सेक्टर ५० मधील निर्मल हाइट्सजवळ लॉजिस्टिक्स व्यावसायिक रूपेश विनोद भोईर, त्यांची पत्नी आणि मुलीवर १० ते १५ जणांच्या जमावाने अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे.

नंदुरबारमध्ये बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला..

लाडक्या बापाला घरी नेण्यासाठी तरुणाईमध्ये मोठा उत्साह....

सोशल मीडियाचा ट्रेन्ड नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये लाडक्या गणरायांसोबत तरुणींचे विशेष फोटोशूट....

पारंपरिक नऊवारी साडी अन् हातात बाप्पा नंदुरबारमध्ये गणेशोत्सवाच्या रीलशूटिंगचा धडाका...

गणेशभक्तीचा अनोखा उत्साह बाप्पाच्या स्वागतासाठी नंदुरबार बाजारपेठ सज्ज ...

Yavatmal: यवतमाळमध्ये सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी, चालकाचा जागीच मृत्यू

यवतमाळ -

- सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी, चालकाचा जागीच मृत्यू

- दारव्हा-कारंजा मार्गावर भीषण अपघात

- चंद्रपूरहून खामगावकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात

Ahilyanagar: मनोज जारंगे यांच्यावर बोलण्यास राधाकृष्ण विखे पाटील यांचा नकार

अहिल्यानगर -

मनोज जारंगे यांच्यावर बोलण्यास राधाकृष्ण विखे पाटील यांचा नकार

आज टंचाईची बैठक आहे’ म्हणत विषय बदलला

Nashik: नाशिकच्या मनमाड आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस

नाशिक -

- नाशिकच्या मनमाड आणि आसपासच्या परिसरात संध्याकाळच्या सुमारास अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली

- या पावसामुळे माना टाकलेल्या पिकांना काही अंशी जीवदान मिळणार असले तरी शेतकरी मोठ्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे

- दरम्यान पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

PM Modi: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे  - पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी -

भारतात एआयचा वापर वाढतोय

ऊर्जा, तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची झपाट्याने प्रगती

भारत स्थिरता आणि विकासचा विश्वास देतो

भारत अर्थव्यवस्था मजबूत करत आहे

रस्ते, रेल्वे, विमानतळाचा वेगाने विकास

भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे.

Buldhana: बुलडाणा, खामगाव, शेगावसह आसपासच्या परिसरात पाऊस

बुलडाणा, खामगाव, शेगावसह आसपासच्या परिसरात पाऊस

महिना भराच्या नंतर पाऊस झाल्याने परिसरातील शेतकरी आनंदित ..

हवामान खात्याने वर्तवला होता पावसाचा अंदाज

गेल्या महिना भरा पासून पाऊस नव्हता, परिणामी पीक सुकली आहेत

- शेतकरी संकटात सापडला आहे

- मात्र आज या परिसरात पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात आहे .

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक, २ तरुणांचा जागीच मृत्यू 

अहिल्यानगर

- 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात

- अपघातामध्ये २ तरुणांचा जागीच मृत्यू

- राहुरी तालुक्यात नगर-मनमाड महामार्गावर घडली घटना

- अपघातामध्ये एक महिला आणि एक तरुण गंभीर जखमी झाले

- जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; राहुरी तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

MPSC च्या अनागोंदी कारभाराविरोधात अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. वारंवार होणारी पेपरफुटी, उत्तरपत्रिकांची चुकीच्या पद्धतीने होणारी तपासणी आणि ढिसाळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येत राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

आम्ही मुंबईला न्यायासाठी येतो आहे आमच्याकडून विघ्न होणार नाही - मनोज जरांगे

आम्ही छत्रपतींना मानणारे आहोत हिंदू धर्मांना देखील मानणारे आहोत ...

आम्ही मुंबईला न्यायासाठी येतो आहे आमच्याकडून विघ्न होणार नाही

लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना थेट टोला; म्हणाले, ‘अजून बच्चा आहेस, आधी अभ्यास कर!’

अभिजीत दिपके यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी त्यांना ‘अजून बच्चा’ म्हणत आधी वास्तवाचा आणि विषयाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळते म्हणून या विषयाकडे पाहू नये, असा टोला लगावत हाकेंनी आतापर्यंत झालेल्या उपोषणांवरही उपहासात्मक टिप्पणी केली.

धाराशिवमध्ये योगेश कदमांचा ताफा अडवला; मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे, जोरदार घोषणाबाजी 

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एकेरी भाषा सहन केली जाणार नाही, असा इशारा योगेश कदम यांनी मनोज जरांगे यांना दिल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. धाराशिवहून परंड्याकडे जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली.

35 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळ-वणीत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा

तब्बल 35 दिवसांच्या खंडानंतर यवतमाळ तालुक्यातील किन्ही, टाकळी, सावरसह वणी तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिके करपत असताना झालेल्या पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, परिसरात गारवा निर्माण झाला आहे.

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 14वा दिवस; तोडगा न निघाल्याने बदनापूरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 14वा दिवस असून, सरकारकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. बदनापूर शहरात आंदोलकांनी जवळपास दोन तास रास्ता रोको करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

वळसंगमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, 5 आरोपी अटकेत 

वळसंग गावात बुधवारी संध्याकाळी दोन गटांत झालेल्या वादातून 25 ते 30 जणांच्या टोळक्याने दगडफेक करत काठ्या आणि रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात 35 वर्षीय सद्दाम अमलीचुंगे यांच्यासह 5 ते 6 जण जखमी झाले होते. गंभीर जखमी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

एमपीएससीच्या सचिवाला काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

मुंबईत एमपीएससीच्या सचिवांना संभाजी ब्रिगेडकडून काळं फासण्यात आल्याच्या घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संभाजी ब्रिगेडला कारवाईचा इशारा दिला आहे. या काळोखासनीच्या घटनेवर भाष्य करताना योगेश कदम म्हणाले की, "तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवता, पण प्रश्न सुटणार नाही. एमपीएससी प्रकरणात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे." तसेच, अशा आंदोलनांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असेही गृहराज्यमंत्री म्हणाले. योगेश कदम धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला तयारीचा आढावा

पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले.

माधुरी हत्तीचे नांदणीत दिमाखात आगमन

महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील भाविकांची लाडकी, तसंच नांदणी मठाची शान असलेली माधुरी हत्ती आज नांदणी मठात मोठ्या दिमाखात दाखल होत आहे. माधुरीच्या आगमनामुळे नांदणी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. माधुरी हत्तीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे. आज सायंकाळी पाच वाजता नांदणी येथील गांधी चौकात माधुरी हत्तीच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.

एमपीएससी सचिवांना काळे फासल्या प्रकरणी ३ जणांना अटक

एमपीएससी सचिवांना काळे फासल्या प्रकरणी ३ जणांना अटक

संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते काल सचिवांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी चर्चा केली

यानंतर काही कागदपत्रे दाखवायची आहेत यासाठी आजची वेळ घेतली

राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

राज्यात पावसाळ्याच्या आधीच एलनिनो सक्रिय झाल्याने यंदा पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि सध्या राज्यात जी स्थिती पाहायला मिळत आहे.

ती पाहता हवामान विभागाने दिलेला इशारा खरा ठरला असून राज्यातील काही भागात गेल्या दीड महिन्यापासून पाऊसच नसल्याने राज्यातील काही भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली.

पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

पंढरपूर शहराच्या वैभवात भर घालणारी आणि जवळपास 110 वर्षांचा इतिहास असलेली पंढरपूर नगरपालिकेची जुनी मुख्य इमारत आता हेरिटेज वास्तू म्हणून जतन केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पात या ऐतिहासिक इमारतीचा समावेश करून तिचा विकास केला जाणार आहे.

गणेशोत्सव काळात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा

गणेशोत्सव काळात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा

हिंदू देवी-देवतांचा आणि गणेशोत्सवाचा अवमान केल्याचा हिंदू सेवा संघाचा आरोप

गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बापट यांच्यावर बंदी घालण्याची मागणी

हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित मारणे यांची आक्रमक मागणी

विद्यानंद बापट यांनी हिंदू भाविक, गणेश मंडळे आणि वारकरी संप्रदायाची बिनशर्त माफी मागावी

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालन्यातील कुंभार पिंपळगावमध्ये रस्ता रोको

कुंभार पिंपळगाव येथील अंबड पाथरी रोडवर मराठा समाजाचा रास्ता रोको..

जवळपास मराठा आंदोलकांनी एक तास रस्ता रोको केला असून महसूल अधिकाऱ्यांना निवेदन दिल आहे..

MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

MPSC पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्र्यांना दोष देणे शंभर टक्के चुकीचे असून, MPSC ही स्वतंत्र संस्था असल्याने या प्रकरणाशी शिक्षणमंत्र्यांचा थेट संबंध नाही, असे सांगत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिक्षणमंत्र्यांची पाठराखण केली.

पेपरफुटीवर मंत्र्यांचा राजीनामा हा उपाय नसून परीक्षा व्यवस्थेतील सिस्टीम बदलण्याची गरज आहे, असे कदम यांनी म्हटले. लाखो विद्यार्थी MPSCच्या परीक्षा देतात, त्यामुळे त्यांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी MPSCवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांऐवजी वरिष्ठ IAS किंवा IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच विठ्ठल मोरे यांच्यासारख्या सक्षम IAS अधिकाऱ्यांनी यापूर्वी MPSCची व्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळली होती, त्यामुळे त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्याची गरज असल्याचेही योगेश कदम यांनी सांगितले.

पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान तब्बल ५ हजार किलो खवा आणि १२ हजार किलो पनीर, असा एकूण ३७ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्यामध्ये भेसळ आहे का, याची तपासणी सध्या सुरू असून, याप्रकरणी एफडीएचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

खनिज सुरक्षेशिवाय ऊर्जा सुरक्षा शक्य नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित भारताच्या वाटचालीत मायनिंग अर्थात खनिज क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खनिज क्षेत्राच्या विकासासाठी नवीन धोरणे आणण्यात आली असून, त्यातून देशाच्या खनिज सुरक्षेला बळकटी मिळत आहे. आज ऊर्जा सुरक्षेचा थेट संबंध खनिज सुरक्षेशी जोडला गेला आहे.

खनिजांची सुरक्षितता नसेल, तर ऊर्जा सुरक्षा शक्य नाही. जग सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या नव्या युगाकडे वाटचाल करत असून, या तिन्ही क्षेत्रांसाठी वीज आणि खनिजे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत आणि विविध देशांमध्ये विभागली जात असताना, प्रत्येक देशाने सक्षम आणि मजबूत खाण क्षेत्र उभे करणे गरजेचे आहे. यातून देशाची खनिज क्षेत्रातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासोबतच विकसित भारताच्या उभारणीला मोठी चालना मिळेल.

सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

यवतमाळ जिल्ह्यात डीजेवर बंदी; पालकमंत्री संजय राठोड

आगामी सण-उत्सवांच्या काळात डीजे आणि बँजो वाजवण्यास बंदी असताना, कुठल्याही मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. मंडळांपर्यंत डीजे पोहोचण्यापूर्वीच नाकाबंदी करून डीजे जप्त करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच सर्व डीजे मालकांची बैठक घेऊन कोणत्याही मंडळाला डीजे भाड्याने देऊ नये, याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वतःचा डीजेचा अनुभव सांगत नेर, दारव्हा आणि दिग्रस येथील रॅलीदरम्यान डीजेसमोर नाचल्यानंतर तीन दिवसांनी कानाचा त्रास सुरू झाला आणि त्यावर महिनाभर उपचार घ्यावे लागल्याचे सांगितले.

लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक, लातूर बार्शी महामार्ग अडवला

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी , लातूरमध्ये मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे, लातूर बार्शी महामार्ग आडवत मराठा समाजाने रोष व्यक्त केलाय, मागच्या एक तासापासून महामार्ग आडवत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. सरकारने तात्काळ म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी मराठा समाजाकडून होते आहे.

नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक, नांदेड हैदराबाद महामार्गावर आंदोलकांनी सुरू केले रास्ता रोको

नांदेड हैदराबाद महामार्ग मराठा आंदोलकांनी तब्बल तासापासून धरला रोखून.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज उतरला रस्त्यावर.

नांदेड हैदराबाद महामार्गावर वाहनांच्या लांब लांब रांगा.

रेल्वेचा रविवारी नऊ तासांचा 'ब्लॉक',  लोकलसह मुंबई-पुणे,पुणे-दौंड एक्स्प्रेस-डेमू रद्द

पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात डी.डी.एस.पॉइंटच्या उन्नतीकरणासाठी रविवारी नऊ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत हा ब्लॉक राहणार असून, त्याचा परिणाम पुणे स्थानकातून धावणाऱ्या लोकल,एक्स्प्रेस आणि डेमू गाड्यांवर होणार आहे.

पुणे-दौंड विभागातील पुणे यार्डमध्ये डी.डी.एस. पॉइंट क्रमांक २२८ (आय) आणि २२६ (श्री) बदलण्याबरोबरच विद्यमान ५२ किलो वजनाच्या रेल्वे मार्गाचे ६० किलो वजनाच्या मार्गात उन्नतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी विशेष वाहतूक आणि वीज ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मराठ्यांनी मागील दोन तासांपासून रोखला..

पुणे - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूस वाहणांच्या लागल्या लांबच लांब रांगा

मनोज जरांगेंचं उपोषण लवकरात लवकर थांबवा अन्यथा महाराष्ट्रात गदारोळ घालण्याचा मराठा बांधवांनी दिला इशारा

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

कोकणात जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

इंदापूर आणि माणगाव जवळ झाली आहे वाहन कोंडी

गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या कोकण वासियांना वाहतूक कोंडीचा फटका

महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या सरकारी डॉक्टरचा धक्कादायक प्रकार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका डॉक्टरने भररस्त्यात सुसाट कार चालवत पादचाऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. कारच्या धडकेत तीन पादचारी जखमी झाले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारचा पाठलाग करून डॉक्टरला पकडले आणि त्याला चोप दिला. दरम्यान, नागरिकांनी डॉक्टरच्या कारचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डॉक्टरला ताब्यात घेतले.

संबंधित डॉक्टर दारूच्या नशेत कार चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, डॉक्टरच्या कारवर ‘इमर्जन्सी ड्युटी, सिव्हिल हॉस्पिटल’ अशी पाटी लावलेली होती. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पाटोदा तालुक्यातील साडेसात वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीने गुन्ह्याची दिली कबुली

- पाटोदा तालुक्यातील एका गावातील शेतात साडेसात वर्षीय चिमुकलीवर 62 वर्षीय नराधमाने हल्ला करत लैंगिक अत्याचार केला.

- यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

- आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पाच दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अंमळनेर पोलिसांनी फोनवरून दिली आहे.

- आज या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून तीन महिन्यात निकाल द्यावा या मागण्यांसाठी पाटोदा शहरात जन आक्रोश मूक मोर्चा निघणार आहे.

भंडारा भीषण अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू, मृतकाचा आकडा पोहोचला ९ वर

छत्तीसगडमधून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनांचा भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या वाहनांमध्ये बहुतांश महिला आणि त्यांची लहान बालके प्रवास करत होती, तर वाहनात एकमेव पुरुष चालक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या वेळी वाहनांमध्ये १६ ते १७ जण प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

या भीषण अपघातात घटनास्थळीच ८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा आता ९ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ बालकांचा समावेश आहे. मृत महिलांपैकी एका महिलेचे वय ५५ वर्षे असून, इतर महिला ३५ वर्षांच्या आसपासच्या असल्याची माहिती आहे. तर मृत झालेली तिन्ही बालके पाच वर्षांखालील आहेत.

चिंचोशीत जमिनीच्या ताब्यासाठी महिला-पुरुष भिडले; थेट शेतात ट्रॅक्टर घुसवून ताबा घेण्याचा प्रयत्न

खेड तालुक्यातील चिंचेशी येथे शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद आता थेट हाणामारीपर्यंत पोहोचलेत. महिला आणि पुरुष एकमेकांवर भिडले असून, शेतात ट्रॅक्टर घुसवून बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत तुफान हाणामारी झालीय

नागपुरात ऐतिहासिक मारबत महोत्सवाचा जल्लोष

नागपुरात आज ऐतिहासिक मारबत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणुका काढण्यात येणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर प्रहार करणारे बडगे तयार करण्यात आले आहेत. "इडा पिडा, रोगराई घेऊन जा गे मारबत" अशा जयघोषात शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उत्सवाला उपस्थित राहणार असून, चार देशांचे डिप्लोमॅट्सही सहभागी होणार आहेत.

पुण्याच्या दिवे घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 तास वाहतूक बंद

पुण्याच्या दिवे घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज दुपारी १२ ते २ या वेळेत दिवे घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी ते पंढरपूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचं नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा.

आळंदीत तृतीयपंथीयांच्या दोन गटांत राडा; वारकऱ्यांसमोरच फ्रीस्टाइल हाणामारी

तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर तृतीयपंथीयांच्या दोन गटांत पैशांची मागणी करण्याच्या कारणावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे पर्यवसान चक्क फ्रीस्टाइल हाणामारीत झाले. विशेष म्हणजे, नदीकाठी उपस्थित वारकऱ्यांसमोरच दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पैशांची मागणी करण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हाणामारी नेमकी कोणत्या कारणावरून आणि कोणाच्या पुढाकाराने झाली, याचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईला निघणार ?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची तयारी? जालना ते मुंबई जाण्यासाठी जालन्यात मीडिया व्हॅन तयार...

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे...

अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला होता त्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे..

सोन्याची चैन लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक..सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

वाशिमच्या कारंजा येथील बस स्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगरमधून अटक केली आहे. चोरीच्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने अहमदनगर बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं.शशिकांत विठ्ठल इष्टे, वय 31 वर्षे, असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून 14.770 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन किंमत 2 लाख 25 हजार, जप्त करण्यात आली आहे. आरोपीने अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पळासखेड्यात तरुणाचा तर भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा खून

भुसावळ जिल्ह्यात गुरुवारी पळासखेडे (ता.पारोळा) आणि भुसावळ अशा दोन ठिकाणी दोन जणांचे खून झाले. पळासखेडे येथील तरुणाचा खून पूर्ववैमनस्यावरून झाला तर भुसावळात खून झालेला इसम हा रेल्वे कर्मचारी होता.

पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल नव्या स्वरूपात लवकरच पुणेकरांच्या सेवेत

पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करून उभारण्यात आलेल्या विस्तारित चेक-इन आणि सिक्युरिटी होल्ड एरियाची केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली.

प्रवाशांची वाढती संख्या, पीक अवर्समधील गर्दी आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन या जुन्या टर्मिनलचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण आवश्यक प्रक्रियांपैकी बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

रेल्वेच्या भुसावळ विभागातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

भुसावळ मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे यार्ड तसेच पुणे-दौंड दरम्यानच्या मार्गावरील रेल्वे लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन (डायरेक्ट करंट नेटवर्क) संबंधित काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी विशेष देखभाल ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या परिणाम होणार आहे. यात पुणे-नागपूर काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर एक्सप्रेस हडपसरहून सुटणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली, संकटातही सर्जा-राजाचा सन्मान

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला असतानाही मेहेकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा मात्र गावात बैलांची कमतरता जाणवली. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत ग्रामस्थांनी बैलांना सजवून त्यांच्या अंगावर झुली चढवल्या. विधिवत पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. गृहिणींनी बैलांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. पावसाअभावी शेतीसमोर मोठे संकट असतानाही खंडाळा देवी गावाने आपली जुनी परंपरा कायम जपत बैलपोळ्याचा उत्साह टिकवून ठेवला. या सोहळ्यात परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या दही हंडीच्या कार्यक्रमात येणार गौतमी पाटील

नांदेड दक्षिणचे शिंदे सेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांच्या वतीने आज दही हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दही हंडीच्या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला बोलावण्यात आले.शिवसेनेच्या दही हंडी कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आनंद बोंडाळकर यांनी जय्यत तयारी केली आहे. गौतमीच्या कार्यक्रमाचे पोस्टर शासकीय कार्यालयात देखील लावण्यात आले आहे.दरम्यान शिवसेनेने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केल्याने उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली.दही हंडी संस्कृतीचा सण आहे त्याबद्दल विरोध नाही,पण त्यात महिलांना नाचवने चूक आहे असं अंबादास दानवे म्हणाले.

भिमाशंकर अभयारण्याच्या रानभाज्यांची शहरी नागरिकांना भुरळ; खेडमध्ये रानभाज्या महोत्सव

भिमाशंकर अभयारण्याच्या डोंगरमाळरानावर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांची ओळख आणि स्वाद शहरी नागरिकांना व्हावा, यासाठी खेड पंचायत समितीच्या आवारात रानभाज्या महोत्सव भरवण्यात आलाय.

एसटी बस नं शेतकऱ्याला चिरडलं

भरधाव आलेल्या एसटी बसने स्कुटीने जाणाऱ्या एका शेतकऱ्याला चिडल्याची घटना भंडाऱ्याच्या वरठी इथे घडली. ही घटना काल पोळ्याच्या दिवशी घडल्याने शेतकरी कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला. कैलास बांते (५८) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. ते मोहाडी तालुक्यातील बीड सीतेपार या गावचे असून वरठी येथे काही कामात निमित्त आले होते. गावाकडे परत जाताना हा अपघात घडला. वरठी पोलिसांनी बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

पुण्यात विजेचा खांब "चोरीला"! महापालिकेच्या मुख्य सभेत राजकीय "शॉक"

पुण्यातील कोंढवा भागात महापालिकेचे विद्युत खांब चोरीला गेल्याचा मुद्दा महापालिका सभागृहात उपस्थित होताच गोंधळ उडाला. भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांनी हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या आसनासमोर एकत्र आले. नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक महापौरांसमोर येऊन घोषणाबाजी करीत असल्याने सभागृहातील वातावरण काही काळ चांगलेच तापले.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे 11 वे उपोषण असून आज उपोषणाचा चौदावा दिवस आहे. त्यांची मध्यरात्री प्रकृती खालवल्याने त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आहेत. त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आली होती. त्याचबरोबर वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी देखील करण्यात आली. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेल्या चार दिवसापासून सरकारच्या शिष्टमंडळाची कुठलीही चर्चा नाही. उद्या मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत 12 वाजता राज्यव्यापी निर्णायक बैठक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com