Manasvi Choudhary
80s च्या काळातील व्हिंटेज फोटो सध्या AI ट्रेंडमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जुन्या काळातील रेट्रो लूक या फोटोतून पाहायला मिळतो आहे.
तुम्हाला देखील असा फोटो तयार करायचा असेल तर तुम्ही कोणताही Prompt न वापरता AIच्या मदतीने तयार करा.
सर्वात पहिले तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरवर ChatGPT सुरू करा.
चॅट विंडोमध्ये खाली दिलेल्या इमेज किंवा अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करा.
AI इमेज तयार करण्यासाठी स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल्स किंवा पर्याय उपलब्ध असतील, त्यामधून '80s काळातील फोटो' हा पर्याय निवडा.
आता तुमच्या गॅलरीतून तुमचा स्पष्ट असा कोणताही एक साधा फोटो तिथे अपलोड करा.
फोटो अपलोड केल्यावर ChatGPT काही सेकंदात तुमच्या फोटोचे विश्लेषण करून त्याला अगदी हुबेहूब ८० च्या दशकातील रेट्रो आणि विंटेज लूकमध्ये रूपांतरित करून देईल.