पेपरफुटीविरोधात उद्रेक! MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, मुंबईत गदारोळ

MPSC Paper Leak Row : MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मुंबईतील आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याने खळबळ उडाली.
MPSC
MPSC साम टीव्ही मराठी
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

MPSC औषध निरीक्षक (Drug Inspector) पेपरफुटीप्रकरणी अखेर विद्यार्थ्यांचा अन् संघटनेचा उद्रेक पाहायला मिळाला. प्रशासनाला वारंवार इशारा देऊनही कारवाई होत नसल्याने, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासले. मुंबईतील या अचानक झालेल्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून MPSC कार्यालयाबाहेर गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPSC पेपरफुटी प्रकरणी ३ ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा देऊनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासले.

MPSC
२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ लाख विद्यार्थ्यांच्या अन् महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या भावनेचा हा उद्रेक आहे. या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि निष्क्रिय सरकारच्या तोंडाला काळं फासून जनतेच्या वतीने सरकारला ही सणसणीत चपराक लगावली अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी दिली. MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासणारे संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या पाठीशी संपूर्ण संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी आहे, असेही ॲड. संतोष शिंदे यांनी स्पष्ट केले.

MPSC
मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द; अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे आदेश

सरकारला ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत उत्तर

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे यांनी या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, "हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत संभाजी ब्रिगेडने हे प्रत्युत्तर दिले आहे. MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा पुढचा नंबर MPSC च्या अध्यक्षांचा असेल, यात तिळमात्र शंका नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com