Ranji Trophy Match In Nashik: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. हे सामने २३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यावेळी मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय संघातील दिग्गज खेळाडू देखील या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे.
ज्यात विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान नाशिककरांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना लाईव्ह खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. हा सामना केव्हा, कुठे आणि कधी रंगणार? जाणून घ्या.
रणजी ट्रॉफीतील सामने हे महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, पुणे किंवा नागपूर या ठिकाणी खेळवले जातात. मात्र आता ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये रणजी सामन्याचा थरार रंगणार आहे. २३ जानेवारीपासून महाराष्ट्र आणि बडोदा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
त्यामुळे नाशिककरांना ऋतुराज गायकवाड, क्रृणाल पंड्या आणि साई सुदर्शनसारख्या फलंदाजांना लाईव्ह खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.
नाशिकमध्ये ६ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हा सामना नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर रंगणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी बीसीसीआय आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या स्टेडियममध्ये एकाच वेळी १० हजार प्रेक्षक सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. यासह प्रेक्षकांना लॉनवर बसून सामन्याचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. कारण नाशिककरांना क्रिकेटचे सामने पाहायचे असतील तर त्यांना मुंबई किंवा पुणेला जावे लागते.
मात्र आता त्यांना कुठेही जायची गरज भासणार नाहीये. या सामन्यासाठी बडोद्याचा संघ नाशिकमध्ये दाखल झाला आहे. क्रृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा बडोद्याचा संघ नाशिकमध्ये पोहोचला असून, खेळाडूंनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. नाशिककरांना महाराष्ट्र आणि बडोदा हा हाय व्हॉल्टेज सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.